टाटाने लॉन्च केली नवी टाटा हेक्सा

टाटा मोटर्सने हेक्सा क्रॉसओवर ही नवी कार लॉन्च केली आहे. याची किंमत 11.99 लाख रूपये आहे. महिन्द्राची एक्सयूवी 500 आणि टोयेटा इनोवा क्रिस्टा सोबत या गाडीची स्पर्धा आहे.

Cars | Updated: Jan 18, 2017, 06:49 PM IST
टाटाने लॉन्च केली नवी टाटा हेक्सा title=

मुंबई : टाटा मोटर्सने हेक्सा क्रॉसओवर ही नवी कार लॉन्च केली आहे. याची किंमत 11.99 लाख रूपये आहे. महिन्द्राची एक्सयूवी 500 आणि टोयेटा इनोवा क्रिस्टा सोबत या गाडीची स्पर्धा आहे.

टाटा हॅक्साची वेरिएंटनुसार किंमत

एक्सई        4x2 मॅनुअल        11.99 लाख रूपये
एक्सएम    4x2 मॅनुअल        13.85 लाख रूपए
एक्सएमए    4x2 ऑटोमॅटिक    15.05 लाख रूपए
एक्सटी        4x2 मॅनुअल        16.20 लाख रूपए
एक्सटीए    4x2 ऑटोमॅटिक    17.40 लाख रूपए
एक्सटी        4x4 मॅनुअल        17.49 लाख रूपए

टाटा हेक्सामध्ये 2.2 लीटरचं वेरीकोर 400 टर्बो-डीज़ल इंजिन देण्यात आलं आहे. याला दोन प्रकारे पावर देण्यासाठी ट्यून करण्यात आलं आहे. एंट्री लेवल वेरिएंट एक्सई मध्ये ही 150 पीएसटी पावर आणि 320 एनएमचं टॉर्क देईल. इतर वेरिएंटमध्ये ही 156 पीएस पावर आणि 400 एनएमचं टॉर्क देईल. बेस वेरिएंट एक्सई मध्ये 5-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स मिळेल तर एक्सएम, एक्सटी आणि एक्सटी 4x4 मध्ये 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स स्टॅडर्ड राहिल. एक्सएमए आणि एक्सटीए वेरिएंटमध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सची सुविधा आहे.

टाटा हेक्सा ही दिसायला शार्प आणि आकर्षक आहे. नव्या डिजाईनसोबत यामध्ये नवे फिचर्स मिळणार आहेत.