मोबाईलवर बँकिंग सर्व्हिस... इंटरनेटशिवाय!

तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन नाही तरीही तुम्हाला बँकींग सर्व्हिसचा वापर करता आला तर... 

Updated: Aug 27, 2014, 03:03 PM IST
मोबाईलवर बँकिंग सर्व्हिस... इंटरनेटशिवाय! title=

नवी दिल्ली : तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन नाही तरीही तुम्हाला बँकींग सर्व्हिसचा वापर करता आला तर... 

होय, हे लवकरच शक्य होणार आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय मोबाईलच्या साहाय्यानं तुम्ही बँकेच्या सेवांचा लाभ घेऊ शकाल.

यासाठी, केंद्र सरकारनं काही पावलं उचलली आहेत. येत्या काही दिवसांत तुमच्या हातातील साध्या हँडसेटवरूनही टेक्स्ट मॅसेज पाठवून फंड ट्रान्सफर, बॅलन्सची माहिती, पीन बदलण्यासारखी काम तुम्ही सहज करू शकाल... आणि मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला इंटरनेटचीही आवश्यकता लागणार नाही.
  
यासंबंधी केंद्र सरकारनं मोबाईल कंपन्यांना काही निर्देश दिलेत. बँकेनं या सेवा अंमलात आणल्यानंतर आपल्या सेलफोनद्वारे लोक बेसिक बँकिंग सेवांचा वापर करू शकतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यात 10 टेलिकॉम कंपन्यांनी सर्व्हिस देण्यासाठी 'नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCI)सोबत करार केले आहेत. NPCI कंपन्यांच्या 'अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेट्री सर्व्हिस डेटा' (USSD) चॅनलवर काम करेल. हा एक टेक्स्ट मॅसेजिंग सिस्टम आहे. यामुळे, खात्यात पैसे भरणं आणि काढण्यासारखेही कामं केले जाऊ शकतील.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.