लग्नाआधी या 6 गोष्टींवर चर्चा करणे आवश्यक

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबाचे एकत्र येणे असते. अरेंज मॅरेजमध्ये आपला जोडीदार निवडताना मुलगी अथवा मुलाशी काही गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. प्रत्येक मुलाच्या अथवा मुलीच्या काहीनाकाही अपेक्षा असतात. लग्नाआधी या अपेक्षा मुलाने अथवा मुलीने होणाऱ्या जोडीदाराला सांगणे गरजेचे असते. लग्नाआधी मुलाने अथवा मुलीने आपल्या जोडीदारासोबत या 6 गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. 

Updated: Dec 3, 2016, 09:40 AM IST
लग्नाआधी या 6 गोष्टींवर चर्चा करणे आवश्यक title=

मुंबई : लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबाचे एकत्र येणे असते. अरेंज मॅरेजमध्ये आपला जोडीदार निवडताना मुलगी अथवा मुलाशी काही गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. प्रत्येक मुलाच्या अथवा मुलीच्या काहीनाकाही अपेक्षा असतात. लग्नाआधी या अपेक्षा मुलाने अथवा मुलीने होणाऱ्या जोडीदाराला सांगणे गरजेचे असते. लग्नाआधी मुलाने अथवा मुलीने आपल्या जोडीदारासोबत या 6 गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. 

कुटुंब : लग्नाआधी जोडीदाराच्या कुटुंबाबबत चर्चा होणे गरजेचे असते. मुलगा एकुलता एक आहे की एकत्र कुटुंबात राहतो. एकत्र कुटुंबात राहत असल्यास मुलीला तिथे अॅडजस्ट करणे जमेल का यावर चर्चाही गरजेची असते.

दोघांचा स्वभाव : लग्नाआधी मुलगा आणि मुलीने एकमेकांचा स्वभाव जाणून घेणे आवश्यक असते. त्यामुळे लग्नानंतर भांडणाचे प्रसंग कमी येतात. 

करिअर : सध्या जितके मुलांच्या करिअरल प्राधान्य दिले जाते तितकेच मुलीच्या करिअरलाही प्राधान्य असते. हाच मुद्दा लक्षात घेऊन मुलींच्या करिअरबाबतही मुलाने विचार करायला हवा. 

फॅमिली प्लॅनिंग : लग्नाआधी फॅमिली प्लॅनिंग होणे गरजेचे आहे. एकमेकांची कामे वाटून घेतल्याने घराची जबाबदारी कोणा एकावर पडत नाही. 

विश्वास : कोणत्याही नात्यात विश्वास असणे गरजेचे. विश्वासावरच नाते टिकते. त्यामुळे जोडीदारावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे. 

खर्चाचा ताळमेळ : लग्न झाल्यानंतर घराची जबाबदारी दोघांची असते. त्यामुळे आर्थिक बजेट कसे सांभाळले जावे यावरही चर्चा होणे गरजेचे.