हे आहे व्हॉट्सअॅपचं नवं फिचर

व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या आवडीचे तीन चॅट लिस्टमध्ये सगळ्यात वरती ठेवता येणार आहेत.

Updated: May 1, 2017, 11:16 PM IST
हे आहे व्हॉट्सअॅपचं नवं फिचर title=

मुंबई : व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या आवडीचे तीन चॅट लिस्टमध्ये सगळ्यात वरती ठेवता येणार आहेत. लवकरच व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी हे नवं फिचर घेऊन येणार आहे.

आवडत्या व्यक्तीबरोबरच आवडता ग्रुपही तुम्ही लिस्टमध्ये सगळ्यात वरती ठेवू शकता. या ऑप्शनमुळे तुम्ही जेव्हा व्हॉट्सअॅप सुरू कराल तेव्हा तुमच्या चॅट लिस्टमध्ये ही तीन नाव किंवा ग्रुप दिसतील. सध्या अँड्रॉईड बिटा व्हर्जनवर उपलब्ध असणारं हे फिचर थोडेच दिवसांमध्ये सगळ्यांना वापरायला मिळणार आहे.