सोशल मीडियामध्ये या पोस्टवरुन रंगलीये चर्चा

भारतात नोटांवर लिहिण्याची लोकांची सवय फार जुनी आहे. अनेकदा लोक काही ना काही नोटांवर लिहितात. मात्र देशभरात नोटबंदीचे वातावरण असतानाच नोटांबाबतची ही पोस्ट खूप व्हायरल होतेय. अनेक नोटांवर एक वाक्य लिहिलेले आढळतेय ते म्हणजे सोनम गुप्ता बेवफा है.

Updated: Nov 14, 2016, 01:27 PM IST
सोशल मीडियामध्ये या पोस्टवरुन रंगलीये चर्चा title=

मुंबई : भारतात नोटांवर लिहिण्याची लोकांची सवय फार जुनी आहे. अनेकदा लोक काही ना काही नोटांवर लिहितात. मात्र देशभरात नोटबंदीचे वातावरण असतानाच नोटांबाबतची ही पोस्ट खूप व्हायरल होतेय. अनेक नोटांवर एक वाक्य लिहिलेले आढळतेय ते म्हणजे सोनम गुप्ता बेवफा है.

500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. केवळ जुन्याच नाही तर 2000च्या नवीन नोटेवरही सोनम गुप्ता बेवफा है असं लिहिलेलं आढळलंय. तर काहींनी सोनम गुप्ताच्या नावाने उत्तरही दिलेय. नाणी, नोटांसह डॉलरवरही हे वाक्य लिहिलेलं दिसतंय. 

दरम्यान, नोटांवर लिहिण्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेहमीच नागरिकांना आवाहन करते की लोकांनी नोटांवर काहीही लिहू नये.