स्मार्ट आणि हँडसम दिसण्यासाठी सोप्या टीप्स

 तुम्ही कसे राहाता यावरून तुमची ओळख होते. हँडसम दिसण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत नाही. काही साध्या गोष्टी जरी फॉलो केल्या तरी तुम्ही अधिक आकर्षक दिसू शकता. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 12, 2016, 10:48 AM IST
स्मार्ट आणि हँडसम दिसण्यासाठी सोप्या टीप्स title=

मुंबई : तुम्ही कसे राहाता यावरून तुमची ओळख होते. हँडसम दिसण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत नाही. काही साध्या गोष्टी जरी फॉलो केल्या तरी तुम्ही अधिक आकर्षक दिसू शकता. 

१. हेअर स्टाईल : हेअर स्टाईल तुमच्या चेहऱ्याची सुंदरता वाढवते. त्यामुळे चेहऱ्याला शोभेल अशी हेअरस्टाईल ठेवा. चिपचिप केसही लूक खराब करतात.  यामुळे कमी प्रमाणात तेलाचा आणि जेलचा वापर करा.

२. शेविंग : काही पुरुष गरजेपेक्षा खूपच शेविंग करुन त्वचा हार्ड करतात. यामुळे चेहरा खूपच खराब होतो. चांगल्या रेजरने शेविंग करुन यानंतर क्रिमचा वापर करा. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होईल. क्लिन शेविंग तुमच्या पर्सन्यालीटीला शोभून दिसते.

३. परफ्यूम : नेहमी चांगल्या ब्रॅंडेड परफ्यूमचा वापर करा. परम्यूम फक्त गळा, छाती आणि गुडघ्याच्यामागे याचा वापर करा.