संकटात मदत करणारा झायमॅन भारतातही

हॉलिवूडपटातील सुपरमँन, स्पायडरमँन ज्याप्रमाणे संकटात असणा-यांच्या मदतीला धावतात. त्याप्रमाणेच भारतातही आता झायमँन आला आहे. जो संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीसाठी येणाराय. कोण आहे हा झायमँन?

Updated: Dec 19, 2014, 11:05 PM IST
संकटात मदत करणारा झायमॅन भारतातही title=

मुंबई : हॉलिवूडपटातील सुपरमँन, स्पायडरमँन ज्याप्रमाणे संकटात असणा-यांच्या मदतीला धावतात. त्याप्रमाणेच भारतातही आता झायमँन आला आहे. जो संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीसाठी येणाराय. कोण आहे हा झायमँन?

देशात महिलांबरोबरच लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतंय. रात्री- अपरात्री, निर्जन ठिकाणी विशेषत: महिलांना शिकार बनवलं जातंय. अशा संकटाच्या केवळ मोबाईलच आपल्या साथीला असतो. आता या मोबाईललाच शस्त्र बनवलंय झायकॉम इलेक्टृॉनिक सिक्यूरिटी कंपनीनं. यासाठी त्यांनी झायकॉम हे मोबाईल एप्लिकेशन बनवलंय.

जीपीएस तंत्रज्ञानावर हे अॅप आधारित असल्यानं संकट स्थळ तात्काळ समजणार आहे. तसंच संबंधित व्यक्ती फार मोठ्या संकटात असेल तर एप्लिकेशनच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीचे फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग झायमॅनच्या कंट्रोल रूममधून केलं जाणाराय.

हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी कुठलाही चार्ज भरावा लागणार नाही. सध्या केवळ सँमसंग मोबाईल धारकांसाठी हे अॅप डाऊनलोड करता येणार असलं तरी काही दिवसातच ते इतर सर्व मोबाईल धारकांसाठीही उपलब्ध होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.