मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हे अॅप तुमच्याकडे हवेच!

पूर्वी मुलांना पंचतंत्र, विक्रम-वेताल आणि मालगुडी डेज यासारख्या बऱ्याच टीव्ही मालिका होत्या. तसचं काहीसं मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी एक व्हीडियो अॅप 'नेक्सजीटीवी' ने सोमवारी लॉन्च केले आहे. त्याच नाव 'नेक्सजीटीवी किड्स' असं आहे.

Updated: May 3, 2016, 09:36 AM IST
मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हे अॅप तुमच्याकडे हवेच! title=

मुंबई : पूर्वी मुलांना पंचतंत्र, विक्रम-वेताल आणि मालगुडी डेज यासारख्या बऱ्याच टीव्ही मालिका होत्या. तसचं काहीसं मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी एक व्हीडियो अॅप 'नेक्सजीटीवी' ने सोमवारी लॉन्च केले आहे. त्याच नाव 'नेक्सजीटीवी किड्स' असं आहे.
 
आता लहान मुलांना खूप छान आणि वेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. याने फक्त मनोरंजन होणार नाही तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील. तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल.

'नेक्सजीटीवी'चे मुख्य अधिकारी अभेष शर्मा यांनी असे सांगितले, आम्ही  'मुलांसाठी मनोरंजन, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी, आणि त्यांना चांगली शिकवण देण्यासाठी हे अॅप लॉन्च केले आहे. तसेच मुलं सुरक्षित वातावरणात लोकप्रिय कार्यक्रम बघू शकतात. त्यामुळे त्यांचे पालक सुद्धा निश्चिंत राहतील. तसेच मुलांना चांगली संगत मिळेल.

हे अॅप गूगल प्ले स्टोर आणि अॅपलवर सुद्धा उपलब्ध आहे.