लवकरच व्हॉट्सअॅपचं 'व्हिडीओ कॉलिंग'

सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच आपल्या युझर्ससाठी एक खास भेट 'व्हॉईस कॉलिंग' फिचरच्या रुपात दिली.

Updated: Apr 2, 2015, 02:26 PM IST
लवकरच व्हॉट्सअॅपचं 'व्हिडीओ कॉलिंग' title=

मुंबई : सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच आपल्या युझर्ससाठी एक खास भेट 'व्हॉईस कॉलिंग' फिचरच्या रुपात दिली.

व्हॉट्सअॅप आता आणखी एक फिचर आपल्या युझर्सना देण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप लवकरच युझर्संना व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्याच्या विचारात आहे.

उपलब्ध माहितीनुसार व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलिंग फिचरवर काम करण्यास सुरुवातही केली आहे. या फीचरचे टेस्टींग कंपनीच्या काही खास कर्मचाऱ्याद्वारे करण्यात येत आहे.

येत्या काही दिवसातच कंपनी हे फिचर लॉंच करु शकते. जे व्हॉट्सअॅपच्या अपडेट व्हर्जनसोबत युझर्सना पुरवण्यात येईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.