व्होडाफोनचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट... मोफत इंटरनेट डाटा!

दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियानं दिवाळीच्या निमित्तानं आपल्या ग्राहकांना एक मस्त दिवाळी भेट दिलीय. 

Updated: Nov 7, 2015, 09:31 AM IST
व्होडाफोनचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट... मोफत इंटरनेट डाटा! title=

नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियानं दिवाळीच्या निमित्तानं आपल्या ग्राहकांना एक मस्त दिवाळी भेट दिलीय. 

व्हिडाफोननं आपल्या ग्राहकांना 100 एमबी डाटा मोफत देण्याची घोषणा केलीय. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना केवळ आपल्या फोनमध्ये 'Diwali' असा मॅसेज लिहून 199 वर एसएमएस करावा लागेल. 

व्होडाफोनच्या जवळ 18 करोड 80 लाख ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. आपल्या ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असल्याचं व्होडाफोननं म्हटलंय. 

दिवाळीला आपल्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा द्यायच्या असतील तर वाट कसली पाहताय, या योजनेचा फायदा घेऊन आपल्या शुभेच्छा त्यांच्यावपर्यंत पोहचवा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.