व्होडाफोन ग्राहकांना 36GB 4G डेटा फ्री देणार

4G इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे.

Updated: Apr 27, 2017, 04:26 PM IST
व्होडाफोन ग्राहकांना 36GB 4G डेटा फ्री देणार  title=

मुंबई : 4G इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे. व्होडाफोन आता त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांना 36GB 4G डेटा फ्री देणार आहे. 12 महिन्यांसाठी हा डेटा ग्राहकांना वापरता येईल. याचबरोबर व्होडाफोन 9GB डेटा तीन महिन्यांसाठी फ्री देणार आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना व्होडाफोनच्या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर टाईप करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी नंबर येईल. हा ओटीपी नंबर वेबसाईटवर टाकल्यानंतर तुमच्या या ऑफरला सुरुवात होणार आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहक व्होडाफोनचा रेड अनलिमिटेड प्लॅन वापरणारा असला पाहिजे. म्हणजेच व्होडाफोनच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला 3GB+9GB डेटा मिळेल. 699 रुपयांच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये ग्राहकाला 5GB+9GB इंटरनेट डेटा मिळेल.