वोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा

 जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?

Updated: Mar 20, 2017, 01:58 PM IST
वोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा

मुंबई : जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?

टेरिफ आणि डेटा प्लान स्वस्त होणार ?
 
प्लान स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. विलीनीकरणानंतर भारतात टेलिकॉम कंपन्यांची संख्या कमी होणार आहे. टेलिनॉरला एअरटेलने खरीदी करण्याची घोषणा केली आहे. आता आयडिया आणि वोडाफोन एक झाल्यामुळे यूजर्सकडे पर्याय कमी झाला आहे. कंपन्यांची संख्या कमी झाली की स्पर्धा कमी होते. त्यामुळे प्लानचे पैसे कमी होतील असं दिसत नाही.

चेअरमन कोण होणार ?

आयडिया आणि वोडाफोन कंपनीचं विलीनीकरण झाल्यानंतर कुमार मंगलम बिरला हेच चेअरमन असणार आहेत. तर कंपनीचे सीएफओ वोडाफोनचा असणार आहे. सीईओची नियुक्ती दोन्ही कंपन्या एकत्र करणार आहेत.

नवीन कंपनी स्थापन होणार ? 

वोडाफोनचे सीईओ विटोरियो यांनी म्हटलं की, दोन्ही कंपन्या मजबूत आहेत. त्यामुळे विलीनीकरण झालं असलं तरी ब्रँडच्या नावानेच कंपनी चालेल. एकत्र मिळून कोणतीही नवीन कंपनी बनवणार नाही.

कधी पासून होणार एकत्र ?

दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झालं असलं तरी त्याची फक्त अधिकृत घोषणा झाली आहे. प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. आयडियाने याला हिरवा कंदील दिला आहे. पण अजून काही परवानग्या मिळणे बाकी आहे. रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया, मार्केट रेग्यूलेटर सिक्योरिटीज अँड एक्सजेंज बोर्ड आणि फोरेन इनवेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड यांची परवानगी अजून बाकी आहे. २०१८ मध्ये प्रक्रिया पूर्ण होईल.

कोणाचे किती शेअर्स? 

विलीनीकरण झाल्यानंतर 45.1 टक्के शेअर्स वोडाफोन तर 26 टक्के शेअर्स आइडियाचे असणार आहेत. बाकी इतर शेयरहोल्डर्सचे असतील.

नंबर-1 बनणार कंपनी? 

विलीनीकरणानंतर भारतात कंपनीचे 400 मिलियन कस्टमर्स असणार आहेत. जे मार्केट शेअरच्या 35 टक्के असणार आहेत. एअरटेल सध्या पहिल्या स्थानावर आहे. पण विलीनीकरणानंतर एअरटेल दूसऱ्या नंबरवर जाणार आहे. सर्वात अधिक मोबाईल यूजर्स तर असतीलच पण रेवेन्यूच्या बाबतीत भारती एअरटेल आणि जिओवर मात करत ही ही कंपनी नंबर १ बनणार आहे.

एअरटेल आणि जिओला होणार नुकसान?

रिलायंस जिओ भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे दुसऱ्या कंपन्यांवर दबाव वाढत आहे. यामुळे एअरटेल आणि जिओला नुकसान नाही होणार. एअरटेलने आधीच टेलीनॉर विकत घेतलं आहे. कंपनी त्यांच्या 4G नेटवर्कला अजून मजबूत करण्यासाठी तिकोना डिजिटल नेटवर्ककडून स्पेकट्रम विकत घेणार आहे. या डीलची वॅल्यू 1500 से 1700 कोटी आहे. रिलायंस जिओ फक्त मोबाईल सर्विसलाच नाही तर इतर सेवांमध्येही आपल्या कस्टमर्सला रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.