मुर्ख बनून राहिल्यास मुलांना मुली आवडतात

Last Updated: Saturday, August 9, 2014 - 13:24
मुर्ख बनून राहिल्यास मुलांना मुली आवडतात

लंडन :  एका नव्या संशोधनानुसार किशोरवयीन मुलींना असे वाटते  की त्यांना आपली समजदारी कमी करू दाखविल्यास किशोरवयीन मुलांना त्यांच्यापासून भीती कमी वाटते. 
वारविक युनिवर्सिटीच्या दर्शनशास्त्र विभागाच्या डॉक्टर मारिया डो मार पेरीरिया यांनी केलेल्या संशोधनात असा निष्कर्ष आला की, १४ वर्षांपेक्षा कमी किशोरवयीन मुलांची अशी धारणा असते की त्यांच्या वयाच्या मुली कमी बुद्धीमान असतात. 

पेरीरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजात काही असे दबाव केंद्र आहेत की ते निश्चित करतात की एक संपूर्ण पुरूष आणि एक संपूर्ण महिला कशी असावी. तरूण मंडळी समाजात फीट बसण्यासाठी या दबावांना बळी पडतात आणि त्यानुसार आपला व्यवहार सुरू ठेवतात. या दबावांपैकी एक म्हणजे तरूण मुलांना मुलींपेक्षा जास्त चतुर, मजबूत, उंच आणि मस्करीखोर असले पाहिजे. तसेच ते त्यांचे जास्त बुद्धीमान महिलेशी संबंध असेल तर त्यांचे पुरुषत्व कमकुवत आहे. 

अध्ययनासाठी पेरीरिया यांनी शाळा आणि शाळा प्रशासनाच्या परवानगीने आठवी इयत्तेतील एका विद्यार्थ्याप्रमाणे काही काळ घालविला. यात विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा आढावा घेतला. त्या वर्गात बसत होत्या, शारीरिक शिक्षणाच्या वर्गात बसल्या, परीक्षा दिल्या, कॅफेटेरियात जेवण घेतले, खेळाच्या मैदानात खेळ खेळले आणि शाळेनंतर शॉपिंग सेंटरमध्येही गेल्या. त्यानंतर तरुणांशी संवाद साधला, भावना आणि व्यवहारांतील पैलू समजून घेतले. या सर्व गोष्टींपर्यंत एखादा शिक्षक किंवा पालक कधी पोहचत नाही. 

पेरीरिया यांनी सांगितले, की एक खरा पुरूष किंवा महिला होण्यासाठी आपण काही गोष्टी गृहीत धरतो. हा विचार आपल्या डोक्यात असतो. हा विचार नैसर्गिक नाही. या प्रतिबंधात्मक अटी आहेत. ज्या किशोरवयीन मुलींसाठी आणि मुलांसाठी नुकसानदायक आहे. 

पुरूषांनी महिलांवर वरचढच राहिले पाहिजे ही धारणा बहुतांशी पुरूषांची असते. ही धारणा किशोरवयीन मुलांना सतत चिंता आणि दबावात ठेवते. त्यांना आपली ताकद सिद्ध करण्याचा दबाव राहतो. मग मारामारीतून असो, दारू पिण्यातून असो, लैंगिक छळातून असो, मदत नाकारणे, भावना व्यक्त न करणे यातून पुरूषांचे पुरूषत्व सिद्ध होते, अशी धारणा बनली आहे. 

पेरीरियाने सांगितले की, किशोरवयीन मुलींना वाटते की, त्यांना त्यांच्या क्षमता कमी करून दाखविल्या पाहिजे. स्वतःची खरी बुद्धी न दाखवता कमी बुद्धिमान दाखविले पाहिजे. शोषण विरोधात बोलले नाही पाहिजे. तसेच असे छंद, खेळ आणि कामं सोडून दिले पाहिजे, जे मुलींना अनुरूप नाही आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 First Published: Saturday, August 9, 2014 - 13:19


comments powered by Disqus