वीस वर्षांनंतर असा असेल तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या ५ फिचर

 तुम्ही तुमच्या स्मार्टफोनपासून बोअर झाले असाल तर ही बातमी तुम्हांला दिलासा देऊ शकते. स्मार्टफोनची टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल तुमचे दरवाजे ठोठवत आहे. बॅटरी अशी असेल की मिनिटात संपूर्ण चार्ज होईल आणि सुमारे १५ दिवस चालेल. 

Updated: Sep 7, 2015, 03:43 PM IST
वीस वर्षांनंतर असा असेल तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या ५ फिचर title=

न्यू यॉर्क :  तुम्ही तुमच्या स्मार्टफोनपासून बोअर झाले असाल तर ही बातमी तुम्हांला दिलासा देऊ शकते. स्मार्टफोनची टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल तुमचे दरवाजे ठोठवत आहे. बॅटरी अशी असेल की मिनिटात संपूर्ण चार्ज होईल आणि सुमारे १५ दिवस चालेल. 

इंटरनेट स्पीट असे काही वाढेल की तुम्ही तुमच्या आवडता चित्रपट तीन सेकंदात डाऊनलोड कराल. स्क्रीन पहिल्यासारखी राहणार नाही. स्क्रीन दुमडणार आणि आपण अनेक फोल्डस्मध्ये त्या स्क्रीनमध्ये दुमडू शकणार आहे. 

१) नॅनो बॅटरी 

सध्याच्या स्मार्टफोन युजर्सची सर्वात मोठी अडचण बॅटरी आहे. फोन दिवसेंदिवस ताकतवर होत आहे. डिस्प्ले चांगले होत आहे, पण बॅटरीमुळे हे नवीन फिचर संघर्ष करीत आहे. 

पण तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आता नॅनो बॅटरी येणार आहेत. या बॅटरीची साइट आताच्या बॅटरीच्या अनेक पट छोटी असणार आहे. परफॉर्मन्स असा असेल त्याद्वारे तुम्ही ३ डी प्रिंट घेऊ शकाल. 

२) मॅजिक टच 
याची संकल्पना खरच जादूच असणार आहे. ही टेक्नॉलॉजी टच करण्यापेक्षा वेगळी असणार आहे. यात ब्रेल लिपीला जोडले जाण्याची शक्यता आहे. असा सरफेस तयार करण्यात येणार आहे, त्याद्वारे समजेल की स्क्रिनवर काय आहे. 

३) इंटरनेटचा सूपर स्पीड 
आज आपण 4G बद्दल बोलत आहे. पण आता 5G स्टार्ट झाला आहे. आपल्याला 5G साठी २०२० पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. याचा स्पीड आताच्या इंटरनेट स्पीडच्या ७० पट अधिक असणार आहे. 

४) मॉड्यूलर फोन 
तुम्ही 'प्रोजेक्ट अरा' बद्दल ऐकले आहे का?  त्यात आपण तुमच्या गरज आणि आवडीनुसार मॉड्यूलर फोन तयार करू शकतात. गुगल या प्रोजेक्टमध्ये आहे. 

५) थ्री डी परतणार 
3D साठी आता वाईट दिवस आहे. टीव्हीवरही याचे क्रेझ आता कमी झाले आहे. पण नवीन टेक्नॉलॉजी याला अधिक सुंदर बनविणार आहे. 

मोबाईलमध्ये 3D लॉन्च करण्यासाठी HTC आणि LG ने २०११ मध्ये अयशस्वी प्रयत्न केला होता. पण आता नवीन तंत्रज्ञान हे शक्य करून दाखविणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.