भारतीय कंपन्या व्हॉट्स अॅपवर नाराज, TRAIनं दखल देण्याची मागणी

Last Updated: Saturday, August 9, 2014 - 12:51
भारतीय कंपन्या व्हॉट्स अॅपवर नाराज, TRAIनं दखल देण्याची मागणी

नवी दिल्ली: व्हॉट्स अॅपचा वापर करणं आता महाग होऊ शकतं. व्हॉट्स अॅप, स्काइप, वी-चॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं देशातील टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर खूप परिणाम होतोय. याचा वापर वाढल्यानं मोबाईल फोन आणि एसएमएसचा वापर खूप कमी झालाय. ग्राहकांनी व्हॉट्स अॅपवर मोठ-मोठे ग्रृप बनवले आहेत आणि त्याद्वारे एकमेकांना मोफत मॅसेज पाठवतात.

टेलिकॉम कंपन्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी कोट्यवधी रुपये खर्चून लायसंस घेतलाय. अशात दुसऱ्या एजंसिज कशा काय त्यांना बायपास करून काम करवून घेऊ शकतात. म्हणून या कंपन्यांनी ट्राय म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे याप्रकरणी मोठं पाऊल उचलण्याची विनंती केलीय. 

व्हॉट्स अॅपमुळं टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर किती परिणाम होतो, याचा अभ्यास ट्राय करणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना वाटतं की ट्राय त्यांच्यावर फी आकारावी किंवा टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्याकडून काही मिळवून द्यावं. महत्त्वाची बाब म्हणजे देशातील टेलिकॉम कंपन्यांची कमाई दिवसेंदिवस वाढत चाललीय कारण युजर्सची संख्याही वाढतेय. असं असतांनाही कंपन्यांनी व्हॉट्स अॅपला विरोध दर्शविलाय. आता बॉल ट्रायच्या कोर्टात आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Saturday, August 9, 2014 - 12:51
comments powered by Disqus