नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले!

जास्तीत जास्त मित्रांशी एकाच ठिकाणी कनेक्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप... पण, नेमकं न्यू इअरच्या अगोदरची संध्याकाळ सुरू झाली... आणि व्हॉटसअपचं काहीतरी बिनसलं. त्यामुळे यूझर्सचंही थोडा वेळ का होईना पण भांबावले.

Updated: Jan 1, 2016, 09:26 AM IST
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले! title=

मुंबई : जास्तीत जास्त मित्रांशी एकाच ठिकाणी कनेक्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप... पण, नेमकं न्यू इअरच्या अगोदरची संध्याकाळ सुरू झाली... आणि व्हॉटसअपचं काहीतरी बिनसलं. त्यामुळे यूझर्सचंही थोडा वेळ का होईना पण भांबावले.

अतिशय लोकप्रिय असलेल्या इन्स्टंट मॅसेजिंग अॅप्लिकेशन यू इअर इव्हला काही तांत्रिक कारणामुळे थोड्या वेळ डाऊन झालं होतं. 

व्हॉटसअप डाऊन झाल्यानं या अॅप्लिकेशन्सच्या चाहत्यांना आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शुभेच्छांचा मॅसेज पाठवताही येत नव्हता... ना कोणता मॅसेज मिळत होता. भारतीय वेळेनुसार रात्री जवळपास १० वाजता ही समस्या सुरू झाली होती.  

व्हॉटसअपनं दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१५ मध्ये जगभरात या अॅप्लिकेशनचे जवळपास ९० करोड यूझर्स होते. त्यामुळे, या अॅप्लिकेशनसाठी नवीन वर्षाच्या अगोदरची संध्याकाळ हा सर्वात जास्त ट्राफिक असणाऱ्या दिवसांपैकी एक ठरला.