आता, तुमचं व्हॉटस्अप झालंय आणखीन सुरक्षित!

व्हॉटस् अप सध्या भलतंच फॉर्मात आहे... आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये विविध बदल करून ग्राहकांच्या पसंतीस उतरणं हा जणू ध्यासच व्हॉटसअपनं घेतलेला दिसतोय.

Updated: Nov 21, 2014, 05:18 PM IST
आता, तुमचं व्हॉटस्अप झालंय आणखीन सुरक्षित! title=

मुंबई : व्हॉटस् अप सध्या भलतंच फॉर्मात आहे... आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये विविध बदल करून ग्राहकांच्या पसंतीस उतरणं हा जणू ध्यासच व्हॉटसअपनं घेतलेला दिसतोय.

नुकतंच, व्हॉटस अपनं आपले ‘रीड’ म्हणजेच वाचलेले मॅसेज समजण्यासाठी ब्लू टिक्स लॉन्च केल्या होत्या... त्यानंतर, पुन्हा एकदा अपडेट करून या ब्लू टिक्स लपवण्यासाठीही व्हॉटसअपनं सुविधा निर्माण करून दिली.

आता, व्हॉटस्अपनं आपलं सिक्युरिटी फिचर लॉन्च केलंय. या फिचरमुळे कुणीही तुम्ही टाईप केलेला मॅसेज वाचू शकणार नाही... किंवा हॅक करण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरेल.

यासाठी, कंपनीनं ‘एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन’ टेक्स्ट सेक्युअर (Text Secure) सॉफ्टवेअरची मदत घेतलीय. या सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं पाठवले गेलेले मॅसेज अशा पद्धतीनं एन्क्रिप्ट होतात की बाकी यूजर्सच्या काहीही कामाची राहणार नाही. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन तोडणं हॅकर्ससाठी अत्यंत कठिण काम आहे... कारण एन्क्रिप्शन तोडण्यासाठी पासवर्ड केवळ यूझरच्या डिव्हाईसमध्ये असतो. 

टेक्स्ट सिक्युअर एन्क्रिप्शन प्रोटोकॉल पाठवल्या गेलेल्या प्रत्येक मॅसेजसाठी वेगळा पासवर्ड बनवतो. व्हॉटसअपनं विसपर सिस्टमसोबत मिळून ही सुविधा लॉन्च केलीय. 

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनमध्ये टेक्स्ट मॅसेजेस मशीन लँग्वेजमध्ये बदलले जातात. त्यामुळे, कुणीही हॅक करू शकत नाही. जेव्हा हा मॅसेज डिव्हाईसवर डिलिव्हर होईल तेव्हा तो मॅसेज पुन्हा टेक्स्टमध्ये बदलला जाईल.

याअगोदर व्हॉटसअप आपण स्वत:हून मॅसेज डिक्रिप्ट करू शकत नव्हतं. पण, आता मात्र हे शक्य होणार आहे. हे फिचर बाय डिफॉल्ट प्रत्येक व्हॉटस्अप यूजर्सच्या डिव्हाईसमध्ये काम करेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.