व्हॉटसअॅपवर व्हिडीओ कॉल करायचाय..तर मग

तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनने व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉल करू इच्छीतात, तर हे शक्य आहे. मात्र हे शक्य होणार नाही, कारण लेटेस्ट वर्जन अजून प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध नाही.

Updated: May 23, 2016, 04:18 PM IST
व्हॉटसअॅपवर व्हिडीओ कॉल करायचाय..तर मग title=

मुंबई : तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनने व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉल करू इच्छीतात, तर हे शक्य आहे. मात्र हे शक्य होणार नाही, कारण लेटेस्ट वर्जन अजून प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध नाही.

जर तुम्हाला व्हॉटसअॅप वर व्हिडीओ कॉलिंग करायचं असेल, तर तुम्हाला व्हिडीओ कॉलसाठी व्हॉटसअॅपचं लेटेस्ट वर्जन डाउनलोड करावं लागेल. हे तुम्ही मॅन्यूअली APK लिंकवर डाऊनलोड करू शकतात.

लिंक http://apk.co/whatsapp/whatsapp-21680, आणि या पद्धतीने तुम्ही WhatsApp चे लेटेस्ट वर्जन एंड्रॉयड स्मार्टफोनवर डाऊनलोड करू शकता.

जर तुम्ही पहिल्यांदा  APKडाऊनलोड करणार असाल, तर तुम्हाला खालील तो इरर मिळेल "For security, your phone is set to block the installation of apps obtained from unknown sources.”

ही अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला फोन सेटिंग्ज सेक्शनमध्ये जावं लागेल, त्यानंतर सिक्युरिटी आणि अननोन सोर्समध्ये जा आणि अननॉन सोर्सला इनेबल करा.

यानंतर तुमचा स्मार्टफोन हा व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉल करण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही व्हॉटसअॅपने कोणत्याही प्रकारची बातचीत केली आहे, तर तो एक रेकॉर्ड आहे, यावरून तुम्ही ऑडीओ आणि व्हिडीओ कॉल दोन्ही करू शकतात.

तसा तुम्ही सध्या व्हिडीओ कॉल नाही करू शकत, कारण तो टेस्टिंगमधून जात आहे.