पहा जगातील सर्वात महागडी बाईक

जरा हटके लूकची बाईक आपल्याकडे पण हवी असे प्रत्येकालाच वाटत असते. आणि म्हणून की काय, जगभर प्रसिद्ध असणा-या हार्ले डेविडसन कंपनीने एक शानदार बाईक बाजारात आणली आहे.

Updated: Feb 23, 2014, 12:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जरा हटके लूकची बाईक आपल्याकडे पण हवी असे प्रत्येकालाच वाटत असते.
आणि म्हणून की काय, जगभर प्रसिद्ध असणा-या हार्ले डेविडसन कंपनीने एक शानदार बाईक बाजारात आणली आहे.
ही बाईक डेनमार्कमधील मोटारसायकल कंपनी लॉज जेनसननी बनवली आहे.
हार्ले-डेविडसनच्या या नवीन बाईकवर सोनांचा मुलामा लावला असून, जगात सर्वात महाग बाईक असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
७५० सीसी इंजनची बाईक हार्ले-डेविडसन स्टीट्रची किंमत ४ लाख १० हजार रुपये आहे. तर स्पेशल एडिशनची या बाईकची किंमत ५.५३ करोड रुपये आहे.
जर्मनमधील हँम्बर्ग मध्ये चालू असलेल्या मोटारसायकल प्रर्दशनात हार्ले-डेविडसनची सोनेरी बाईक लोकांना बघण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.