शियोमीचा अवघ्या 4 हजार रुपयांत 4G स्मार्टफोन लवकरच!

चीनची अॅपल कंपनी म्हटलं जाणारी मोबाईल कंपनी शियोमी लवकरच बाजारात एक असा 4जी स्मार्टफोन आणणार आहे. ज्याची किंमत आहे केवळ 4 हजार रुपये. या हँडसेटच्या नावाचा खुलासा अजूनपर्यंत झाला नसला तरी हा फोन 4G नेटवर्कला सपोर्ट करेल.

Updated: Nov 18, 2014, 11:10 AM IST
शियोमीचा अवघ्या 4 हजार रुपयांत 4G स्मार्टफोन लवकरच! title=

बीजिंग: चीनची अॅपल कंपनी म्हटलं जाणारी मोबाईल कंपनी शियोमी लवकरच बाजारात एक असा 4जी स्मार्टफोन आणणार आहे. ज्याची किंमत आहे केवळ 4 हजार रुपये. या हँडसेटच्या नावाचा खुलासा अजूनपर्यंत झाला नसला तरी हा फोन 4G नेटवर्कला सपोर्ट करेल.

मिळालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये 720 पिक्सेलचा HD डिस्प्ले आणि 1 जीबी रॅम आहे. चीनी वेबसाइट Gizchina नुसार कंपनीनं एक नवा लीडकोर चिपसेट तयार केलाय. या चिपसेट स्वस्त असून कंपनीनं  नव्या हँडसेटमध्ये याच चिपसेटचा वापर केल्याचं कळतंय. 

शियोमीच्या या हँडसेटची सर्वच जण खूप वाट पाहत आहेत. हा हँडसेट स्मार्टफोनच्या बाजारात नवी क्रांती घडवेल, असं टेक तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.