‘जिओमी’च्या स्मार्टफोनसाठी झुंबड, ‘फ्लिककार्ट’ क्रॅश!

‘चीनची अॅपल कंपनी’ म्हणून दर्जा मिळवणारी ‘जिओमी’ मोबाईल निर्माती कंपनीचे हात सध्या आभाळाला टेकलेत. कारण, मार्केटवर या कंपनीचा दबदबा मोठ्या सगळ्याच जगानं पाहिलाय.

Updated: Aug 6, 2014, 08:15 AM IST
‘जिओमी’च्या स्मार्टफोनसाठी झुंबड, ‘फ्लिककार्ट’ क्रॅश!

नवी दिल्ली : ‘चीनची अॅपल कंपनी’ म्हणून दर्जा मिळवणारी ‘जिओमी’ मोबाईल निर्माती कंपनीचे हात सध्या आभाळाला टेकलेत. कारण, मार्केटवर या कंपनीचा दबदबा मोठ्या सगळ्याच जगानं पाहिलाय.

भारतीय मार्केटमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या Mi3 स्मार्टफोनला विक्रीसाठी आणि आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी अजिबात कष्ट पडले नाहीत... याउलट ग्राहकांनाच हा फोन विकत घेण्यासाठी कसरत करावी लागतेय. 

ऑनलाईन रिटेल वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’वर उपलब्ध असलेल्या या फोनचा संपूर्ण स्टॉक मंगळवारी काही सेकंदांत संपल्याचं दिसलं. एव्हढचं नाही तर यादरम्यान ट्रॅफिक वाढल्यानं फ्लिपकार्टची वेबसाईटही क्रॅश झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास दीड लाख जणांनी यापूर्वीच फोनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. मंगळवारी केवळ 15,000 फोनच विकले जाणार होते. दुपारी दोन वाजता जिओमीनं स्मार्टफोनची विक्री सुरू केली... आणि बघता बघता वेबसाईटचा सर्व्हरच हॅँग झाला. त्यानंतर काहीच वेळात Mi3 हा स्मार्टफोन ‘आऊट ऑफ स्टॉक’ दाखवण्यात आला.  

‘फ्लिपकार्ट’ची वेबसाईट क्रॅश होण्याची ही तिसरी वेळ आहे. मागच्या वेळेस या ऑनलाईन रिटेलरनं केवळ 5 सेकंदात Mi3 चा पूर्ण स्टॉक विकला होता. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू होतंय. या फोनची विक्री आता 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. या फोनची किंमत 13,999 रुपये आहे.  

जिओमी Mi3 चे फिचर्स :-
* डिस्लेरो  - 5-inch Full HD 1080p
* अँड्रॉईड- 4.4
* प्रोसेसर- Qualcomm Snapdragon 800 8274AB
* रॅम- 2GB
* मेमरी- 16 GB
* कॅमेरा- 13 Mp रीअर, फ्रंट- 2Mp
* फ्लॅश- ड्युएल एलईडी
* कनेक्टिविटी- 3G(WCDMA) आणि 2G(GSM)
* ब्लू्-टूथ, वायफाय
* बॅटरी- 3050 mAh

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.