श्योमीचा नोट४ लाँच, किंमत ९,९९९ रुपये

चायनीज हँडसेट मेकर श्योमीने गुरुवारी रेडमी सीरिजमधील रेडमी नोट४ हा स्मार्टफोन लाँच केला. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर या फोनची विक्री सुरु झालीये. या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ९,९९९ रुपये इतकी ठेवलीये.

Updated: Jan 19, 2017, 03:51 PM IST
श्योमीचा नोट४ लाँच, किंमत ९,९९९ रुपये title=

नवी दिल्ली : चायनीज हँडसेट मेकर श्योमीने गुरुवारी रेडमी सीरिजमधील रेडमी नोट४ हा स्मार्टफोन लाँच केला. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर या फोनची विक्री सुरु झालीये. या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ९,९९९ रुपये इतकी ठेवलीये.

दोन पर्यांयामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. २ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये तर ३ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये आहे.  

हे आहेत याचे फीचर्स

५.५ इंचाचा डिस्प्ले
१३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
२ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध
इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्ड द्वारे 128जीबी पर्यंत वाढवण्याची सुविधा
२ गिगाहर्टझ ओक्टाकोर
डेकोकार मीडियाटेक हेलिओ X२० 
किंमत - ९,९९९ रुपये