यू-ट्युब'मुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ

यू-ट्यूबवरील जाहिराती प्रभावी ठरत असल्यामुळे,  यूट्यूबवरील जाहिरातींचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. गुगलने आपल्या तिमाहीचा रिपोर्ट काल जाहीर केला.

Updated: Oct 28, 2016, 06:36 PM IST
यू-ट्युब'मुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ title=

सॅन फ्रॅन्सिस्को : यू-ट्यूबवरील जाहिराती प्रभावी ठरत असल्यामुळे,  यूट्यूबवरील जाहिरातींचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. गुगलने आपल्या तिमाहीचा रिपोर्ट काल जाहीर केला.

गुगलची मदर संस्था असलेल्या अल्फाबेटच्या उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र यू-ट्यूबमधून नेमके किती उत्पन्न मिळाले, हे गुगलने अजून जाहीर केलेले नाही. मात्र  यंदाच्या तिसऱ्या तिमाहीअखेरचे 'अल्फाबेट'चे उत्पन्न 5.1 अब्ज डॉलर इतके होते. 

यूट्यूबच्या या कामगिरीवर गुगल फिदा आहे, म्हणून यूट्यूबवर टेलिव्हिजनचे जास्तच जास्त कार्यक्रम आणण्यासाठी यूट्यूब, टीव्ही मालिका निर्मात्यांकडे आग्रही आहे. यूट्यूबचं उत्पन्न आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हं आहेत.

यूट्यूबमुळे गुगलचे चर्चेत असलेले अनेक प्रकल्प, यूट्यूबच्या आर्थिक पाठबळामुळे वेगात पूर्ण होऊ शकणार आहेत.  'यू-ट्युब'चे बहुतांश युझर्स 18 ते 34 या वयोगटातील आहेत. 'यू-ट्युब'च्या युझर्सची संख्या 1 अब्जांहून अधिक असल्याचं अहवालात म्हटलंय.