स्वातंत्र्यदिनानिमित्त यूट्यूबवर ‘बिइंग इंडियन'चा नवा व्हिडिओ

Last Updated: Thursday, August 14, 2014 - 09:19
स्वातंत्र्यदिनानिमित्त यूट्यूबवर ‘बिइंग इंडियन'चा नवा व्हिडिओ

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्चर मशीन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या यूट्यूब चॅनलवर ‘बिइंग इंडियन’वर एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. इंडियाज फेसबुक टाईमलाईन जर्नी - हॅप्पी इंडिपेंडन्स डे.असे त्याचे नाव आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 2014 पर्यंतच्या निवडणुकींचा प्रवास फेसबूकद्वारे एका अनोख्या अंदाजात सादर केला आहे. व्हिडिओची सुरूवात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला फेसबूकवर एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे खाते ओपन करतो आणि इथून सुरू होतो एक सुंदर प्रवास.

यात फेसबूक लाइक, फोटो लोड, माइलस्टोन सारख्या फिचरचाही वापर केला आहे. तसेच व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये राष्ट्रगीताचे वेगळे व्हर्जन आपल्याला ऐकू येतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 14, 2014 - 09:19
comments powered by Disqus