नौदलाच्या सामर्थ्याचे 'विराट' दर्शन

स्मिता मांजरेकरप्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रम करण्याचं कित्येक दिवस मनात योजलं होतं. तसंच हा विशेष कार्यक्रम नौदल किंवा सेनादलाच्या सैनिकांसह करावा हा विचार मनात होता. प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनलवर अशाप्रकारचे कार्यक्रम आपण नेहमीच पाहतो, मात्र आपल्या मराठी न्यूज चॅनलमध्येही असाच शो आपण करावा अशी कल्पना मनात आली...

Updated: Jan 31, 2012, 05:44 PM IST

 स्मिता मांजरेकर

 

प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रम करण्याचं कित्येक दिवस मनात योजलं होतं. तसंच हा विशेष कार्यक्रम नौदल किंवा सेनादलाच्या सैनिकांसह करावा हा विचार मनात होता. प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनलवर अशाप्रकारचे कार्यक्रम आपण नेहमीच पाहतो, मात्र आपल्या मराठी न्यूज चॅनलमध्येही असाच शो आपण करावा अशी कल्पना मनात आली... त्याप्रमाणे जवळपास दोन महिने आधी शूटिंगच्या परवानगीसाठी नौदल अधिका-यांशी चर्चा सुरू केली.

 

नौदल किंवा सेनादलासह शूटिंग करणं, त्यासाठी परवानगी मिळवणं या गोष्टी किचकट असतात. त्यामुळेच त्यांच्याकडे न जाता दुसरा मार्ग निवडावा असंही काहींनी सुचवलं. मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाने हे नवं आव्हान स्वीकारलं आणि कामाला लागले. नौदलाकडून परवानगी मिळवण्यासाठी मुंबईसह दिल्लीचेही दरवाजे ठोठवलं. दिल्लीच्या संरक्षण मंत्रालयाच्या विभागाशी बोलणी सुरू केली मात्र कित्येक दिवस झाले तरी त्यांच्याकडून होकार काही मिळत नव्हता...

 

दरम्यान या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रेटींशी बोलणी सुरु केली. अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली मात्र शूटिंगच्या तारखा काही जुळत नव्हत्या...त्याच दरम्यान सचिन पिळगावकर यांच्याकडेही फोनवरून ही कल्पना मांडली ..त्यांना ही कल्पना खूपच आवडली..आणि पहिल्याच फोनमध्ये त्यांनी त्यांचा होकार कळवला आणि नंतर शूटिंगसाठी तारखांची जुळवा-जुळवी केली...सचिन यांची डेट तर मिळाली मात्र अजूनही माझ्यपुढे यशप्रश्न होता तो म्हणजे नौदलाकडून परवानगी मिळवण्याचा.

 

पुन्हा नव्या जोमाने दिल्ली संरक्षण विभागातील कमांडरशी बोलणी सुरू केली. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते खरं असल्याचं प्रत्यय मला आला. एकेदिवशी दुपारी दिल्लीच्या कमांडरचा फोन आला की तुम्हाला प्रजासत्ताक दिनी नौदलावर विशेष कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता पुढील कारवाईसाठी मुंबई ऑफिरसशी संपर्क साधा. मुंबईमध्ये उरलेली कारवाई पूर्ण केल्यानंतर 19 जानेवारीला शूटिंग करण्याचं निश्चित केलं.. अखेर सगळी अग्निदिव्य पार केल्यानंतर ठरल्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा आयएनएस शिक्राला भेट दिली..

 

सचिन पिळगावकरही या ठिकाणी पहिल्यांदाच आले होते त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनाही भारतीय नौसेनेची खूप माहिती मिळाली. आयएनएस शिक्रा याठिकाणी नौसेनेची हेलिकॉप्टर्स ये-जा करत होते.. चेतक आणि सी-किंग या दोन हेलिकॉप्टरची माहिती तिथल्या कमांडरने दिली..

 

मराठी शो असल्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणारे कमांडर हे देखिल मराठीच असावेत हे मी आधीच स्पष्ट केलं होतं.. तशी परवानगी आधीच घेऊन ठेवली होती...त्याप्रमाणे कमांडर विक्रांत बर्वे, लेफ्टनंट कमांडर प्रविण चिने, कमांडर रणजीत गणकुले यांनी नौसेनेच्या हेलिकॉप्टरची सविस्तर माहिती दिली..तसंच यानिमित्ताने सी-किंग या महाकाय हेलिकॉप्टरलाही जवळून पाहता आलं..सी-किंग हे नावाप्रमाणे किंग हेलिकॉप्टर आहे.

 

सी-किंग हे भारतीय नौसेनेच्या सेवेत असलेलं महाकाय हेलिकॉप्टर आहे. त्याचं विशाल रुप कोणाच्याही नजरेत भरेल असंच होतं. 12 इंजिन असलेलं हे हेलिकॉप्टर पाण्यावरही उतरू शकेल अशी माहिती आम्हाला कमांडर रणजीत गणकुले यांनी दिली. हेलिकॉप्टरची माहिती दिल्यानंतर चेतक आणि सी-किंगचं लँडिंग आणि टे-ऑफही आम्हाला दाखवण्यात आलं तो नजारा पाहून भारतीय नौदलाचं कौतुक करावंस वाटलं आणि नकळतपणे ऊर अभिमानाने भरून आला.

 

आयएनएस शिक्रानंतर आम्ही युध्दनौका बघायला निघालो. युध्दनौकेचं आकर्षण मला स्वत:लाही होतंच. युध्दनौका पाहण्याचं माझं स्वप्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने साकार झालं. आयएनएस शिक्राच्या भेटीनंतर लायन गेटला आम्ही युध्दनौका पाहायला गेलो..लायन गेटला पुन्हा सिक्युरिटीचा सामना करावा लागला...कागदपत्रांची खात्री पटल्यानंतर आम्हाला आत सोडण्यात आलं. महाकाय युध्दनौका, त्यासाठी तैनात असलेले कमांडर, ऑफिसर्सची चाललेली वर्दळ, हे दृष्यं पा