या आठवड्यातील शेअर बाजार

शेअरबाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांना इच्छा असते, पण त्याबाबत प्रत्येकाला माहिती असतेच असे नाही. चुकीच्या किंवा अपु-या माहितीअभावी केलेली गुंतवणूक जोखमीची असते. ते टाळण्यासाठी शेअरबाजारासंबंधी महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना मी आपल्याला समजावून सांगतो.

Updated: Jun 4, 2012, 04:13 PM IST

दिनेश पोतदार, www.24taas.com,  मुंबई

 

गेल्या  सप्ताहातील शेअर बाजारातील चढ-उतार

 

सरत्या आठवड्यातल्या पाचपैकी तीन दिवस बाजार घसरलेला होता. भारताचा विकासदर 5 पूर्णांक 3 वर घसरल्याचं वृत्त आणि राजकीय अस्थिरतेमुळे ग्रीस युरो झोनमधून बाहेर पडण्याच्या शक्यतेचा बाजारावर प्रभाव राहिला. आठवड्याच्या सुरुवातीला बाजार सकारात्मक होता. सोमवारी ग्रीसमधल्या परिस्थितीत काहीशी सुधारण्याची आशा दिसल्यामुळे जागतिक स्टॉक्स वधारले होते आणि त्यामुळे भारतीय शेअरबाजारातही वाढ दिसून आली. सोमवारी शेअरबाजार 200 अंशांनी वधारला होता. मात्र, हीच तेजी मंगळवारी दिसून आली नाही. मंगळवारी बाजार फक्त 21 अंशांनी वाढला होता. सोमवार, मंगळवारची वाढ बुधवारी कायम राहिली नाही. स्पेनमधलं आर्थिक आरिष्ट आणि त्यामुळे युरोपियन कर्जसंकटाची वाढती चिंता यामुळे जागतिक स्टॉकमध्ये मोठी घट दिसून आली. त्याचा भारतीय बाजारावरही प्रभाव राहिला आणि बाजार 126 अंशांनी घसरला. गुरुवारी मंदी कायम होती. घटलेल्या विकासदराची माहिती समोर आल्यानं गुरुवारी बाजार 93 अंशांनी घसरला. शुक्रवारी बाजार 82 अंशांनी घसरला. जागतिक स्तरावर मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राचं घटणारं उत्पादन आणि मॉन्सुनच आगमन लांबणीवर पडल्याच्या वृत्ताचा शुक्रवारी बाजारावर प्रभाव राहिला. शेअरबाजारातल्या वेगवेगळ्या सेक्टर्सच्या कामगिरीवर यानंतर नजर टाकू या..

 

विविध सेक्टर्सची कामगिरी

 

शेअरबाजारातल्या प्रमुख 13 सेक्टर्सपैकी फक्त 4 सेक्टर्स वधारले होते तर 9 सेक्टर्स घसरले होते. पहिल्यांदा नजर टाकू या ऑटो सेक्टर्सकडे.. ऑटो सेक्टरमध्ये घट दिसून आली. भारतातील सर्वाधिक व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स घसरले होते. सेन्सेक्स पॅकमध्ये घसरणा-या कंपन्यांच्या यादीत टाटा मोटर्स अव्वलस्थानी होती. लहान कार उत्पादक कंपन्यांपैकी प्रमुख मारूती सुझुकीचे स्टॉक्स घटले होते. मेटल सेक्टर्समध्ये जिंदाल स्टीलचे स्टॉक्समध्ये घट दिसून आली. वळू या आईल एण्ड गॅस क्षेत्राकडे.. सबसिडीच्या वाढत्या ओझ्यामुळे ओनजीसीचे स्टॉक्स घसरले होते. ऑईल इंडिया आणि गेल इंडियाच्या शेअर्समध्ये घट दिसून आली. नफ्यात घट झाल्यामुळे रियॅलिटी क्षेत्रातली प्रमुख कंपनी डीएलएफचे स्टॉक्स घसरले होते. सरत्या आठवड्यात आयटी क्षेत्रात वाढ दिसून आली. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या तीनही प्रमुख आयटी कंपन्यांचे स्टॉक्स वाढले होते. हिंडाल्कोकडून काही कोल ब्लॉक्सच्या वापरासंबंधी अडथळे दूर करण्याची मंत्रीगटानं शिफारस केल्यामुळे हिंडाल्कोचे स्टॉक्स वधारले होते. सेन्सेक्स पॅकच्या 30 कंपन्यापैकी 18 स्टॉक्स घसरले होते. सेन्सेक्स पॅकपैकी स्टर्लाईट इंडस्ट्रीज, लार्सन एण्ड टूर्बो आणि ICICI बॅकेचे स्टॉक्स घसरले होते. तर सेन्सेक्स पॅकपैकी टाटा पॉवर, कोल इंडिया, एनटीपीसी, महिंद्रा एण्ड महिंद्रा, आयटीसी, भारती एअरटेल हे स्टॉक्स वधारले होते. प्रमुख 13 सेक्टर्सपैकी ऑटो, बॅंक, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स, मेटल, ऑईल एण्ड गॅस, पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि रियॅलिटी हे सेक्टर्स घसरले होते. तर FMCG, हेल्थ केअर, आयटी आणि टेकके हे सेक्टर्स वधारले होते.

 

शेअर बाजारविषयक  मूलभूत संकल्पना

 

शेअरबाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांना इच्छा असते, पण त्याबाबत प्रत्येकाला माहिती असतेच असे नाही. चुकीच्या किंवा अपु-या माहितीअभावी केलेली गुंतवणूक जोखमीची असते. ते टाळण्यासाठी शेअरबाजारासंबंधी महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना मी आपल्याला समजावून सांगतो. आज आपण डी -मॅट खाते म्हणजे काय ? हे समजाऊन घेणार आहोत. डी मॅट खाते हा शेअरबाजारातील व्यवहाराचा केंद्र बिंदू आहे. बॅकेतल्या व्यवहारांसाठी ज्याप्रमाणे पास बूक असते, त्याप्रमाणे शेअरबाजारातल्या व्यवहारांसाठी डी-मॅट खाते असते. ब्रोकर किंवा सब-ब्रोकरक