राज्यात शेतीची नशा

Last Updated: Tuesday, June 5, 2012 - 18:02

सुरेंद्र गांगण

 

काहीतरी करण्यासाठी  कोणी तरी म्हटलं आहे की, प्रत्येकाला कशाचं तरी वेड (झिंग, धडपड) असलं पाहिजे, म्हणजे काहीतरी करण्याचे!  तरच आपले उद्दीष्ट गाठता येते. पण हे वेड चांगलं असावं, नाहीतर तुम्ही बाराच्या भावात गेले म्हणून समजा. आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची नशा असावी लागते. त्यातूनच आपले ध्येय गाठता येते. म्हणजेच (कोणत्या ना कोणत्या तरी) या नशेमुळे प्रत्येक जण जीवनात यशस्वी होतो. तर  दुसरीकडे विकास साध्य करण्यासाठी खेड्याचा विकास केला  पाहिजे, असे ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’, सांगणारे महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा सल्ला दिला होता. खेड्यात शेती विकास झाला तर आपल्या देशाची उन्नती होईल आणि आपल्या विकासाचा दर उंचावेल, असे म्हटले होते. त्यामुळे आपल्या भारत या कृषीप्रधान देशात शेतीला महत्व दिले गेले. मात्र, ते आज तेवढ्या तत्परतेने देताना दिसत नाही. शेतीच्या बाबतीत आजच्या महाराष्ट्रात याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. राज्यात झिंग (नशेली) आणणारी शेती केली जात आहे.  अशा शेतीची नशा चढत आहे. हे वास्तवचित्र पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्याच्या अधोगतीचं  आहे.

 

 

श्रीमंतीसाठी शेतीची झिंग

दरम्यान, यावर्षी देशात शेतीचे चांगले उत्पादन झाले असल्याचे अलिकडेच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले होते. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता. तर राज्यात शेतीवर जास्त भर असल्याचे चित्र रंगवले गेले होते. हे आशादायी चित्र सुखावणारे होते. मात्र, याला आता गालबोट लागले आहे. कारण राज्यात अफूची शेतीची वाढ होत असल्याचे पुढे आले आहे. बंदी असताना ३०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर अफूचे पीक घेतले गेल्याचे सध्यातरी दिसत आहे. बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे. ही पेरणी केवळ बीड जिल्हयात न होता, अन्य जिल्हयातही केली गेली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातही याची पाळेमुळे पसरत गेल्याचे पुढे आले आहे. आणखी एक पाऊल पुढे टाकत ही शेतीची झिंग कोल्हापुरातही पोहचली. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या शेतीमुळे चर्चेत आला आहे.

 

 

जबाबदार कोण आहे, राजकारणी की शेतकरी?

आपण मराठवाड्याचा विचार केला तर शेतऱ्याला नेहमीच तोटा सहन करावा लागत आहे. कधी पाऊस पडतो तर कधी नाही. कधी हातचे पीक वाया जाते. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला.  एरवी कोरडवाहू आणि दुष्काळी असलेल्या बीड जिल्ह्यात कर्जबाराचे ओझे न पेलल्याने टोकाचा मार्ग स्वीकारताना शेतकरी आत्महत्येकडे वळताना दिसला आहे. मात्र, सांगली आणि कोल्हापूरची गोष्ट वेगळी आहे. येथील शेतकरी सधन आहे. तो पैसे मिळवण्याच्या नादात काय करतो आहे, याचे त्याला भान राहिले नाही. मात्र, ही अफूची शेती करण्यासाठी कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय शेतीची नशा येणे शक्यच नाही. हे सांगण्याचे कारण की राज्यातील गृहमंत्र्याच्या गावात, अशी शेती सापडणे म्हणजे कायद्याच्या दृष्टीने दुर्दैव ते कोणते? राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही, हेच यातून स्पष्ट होते. आर. आर. पाटील यांनी काही वर्षांपूर्वी डान्सबारवर बंदी आणली. मात्र, आजही डान्सबार छुप्या पद्धतीने सुरू आहेत. केवळ लोकांच्या

First Published: Tuesday, June 5, 2012 - 18:02
comments powered by Disqus