'वाघ्या' उखडून इतिहास बदलतो का?

Last Updated: Thursday, August 9, 2012 - 13:43

सुरेंद्र गांगण
gangan.surendra@gmail.com
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक सोहळा रायगडावर केला. हा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्याच रायगडावर मलाही स्थान दिले. मात्र, मी गेले कित्येक वर्षे ऊन, पावसात चबुदऱ्यावर जागच्या जागी बसून आहे. माझा कोणाला उपद्रव नाही. मात्र, असे असले तरी मी काहींच्या डोळ्यात खुपलो आणि मला १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडचे स्वत:ला इतिहासपंडित म्हणवणाऱ्यांनी उखडून फेकून दिले. काय होती माझी चूक? १९३६ साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा महाराणी पुतळाबाई यांच्या समाधीवर बसविण्यात आला, असे काहींचे म्हणणे आहे. तर काही जण म्हणतात ‘वाघ्या’ हे नाटकातील काल्पनीक पात्र आहे. आता ते असेलही खरे. यात माझा काय दोष?
सुमारे १९३६पासून एकाच जागेवर आहे. आता किती पावसाळे उलटून गेलेत. स्वत:ला अती शहाणे समजणारे समाजाला माझा उपद्रव होत आहे, असे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजात हाच (वाघ्या) एक मोठा गंभीर प्रश्न आहे, असे दाखविण्याचा जाणूनबुजून भास करीत आहेत. याला काही राजकीय पुढारी दादांचे बळ आहे. याशिवाय संभाजी ब्रिगेडची मुजोरी वाढू शकत नाही, हेच त्यांच्या कृत्यातून दिसून आले. समाजात किती गंभीर प्रश्न आहेत, त्यावर काही या लोकांनी सुचत नाही. ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. गावात पाणी नाही, रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक प्रकल्प बंद पडत चालले आहेत. रोजगार निर्माण होण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. झाडांची कत्तल केली जात आहे. प्रदुषणाचा प्रश्न दिवसागणिक वाढत आहे. लोकांची कामे होत नाहीत. लोकांच्या प्रश्नांवर सरकारला कधी जाब विचारण्याचे हे लोक धाडस करीत नाहीत. गड-किल्ल्यांचे बुरूज ढासळत आहेत, त्याची डागडूजी होण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. मात्र, मुक्या प्राण्याचा प्रश्न निर्माण करून समाजात तेढ निर्माण केले जात आहे. याला काय म्हणायचे,  हेच का ते विद्वान? यांनाच कळतो का इतिहास? समाजातील प्रश्न सोडवायचे नसतील तर किमान दुसरे प्रश्न निर्माण करू नका. समाजातील शांतता बिघडवू नका.

वाघ्या कुत्र्याची कथा ही दंतकथा आहे. शिवचरित्रात तिला कुठलाही पुरावा नाही. शिव समाधीसमोरील हे स्मारक म्हणजे इतिहासाचा अपमान आहे. कथा, कादंबर्‍या आणि नाटकांतून रंगवलेल्या वाघ्या कुत्र्याचा इतिहासाशी संबध नाही, असे जरी इतिहासकार म्हणवणाऱ्यांना सांगायचे असले तरी, ते आताच का?  राजकारणात काही घडामोडी सुरू झाल्या आणि राजयकीय आरोप-प्रत्योरोप अथवा घोटाळे बाहेर आले की ब्रिगेडच्या लोकांना इतिहास आठवतो. मध्यंतरी पुण्यातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रात्रीच हटवला गेला. याला काय म्हणायचे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, इथे तर महाराष्ट्रात काही चांगले करायचे नाही. ज्याचा उपद्रव होत नाही, त्याच गोष्टींचा बाऊ करायचा, असा उद्योग चार-दोन टकली करीत आहेत. याला घतपाणी घालण्याचे काय राजकारणातील दादा लोक करीत आहेत. आता जर शिवाजीराजे महाराष्ट्रात हयात असते तर त्यांना किती दु:ख झाले असते. तर दुसरीकडे ज्यांनी हे शिल्प बनविले. त्या शिल्पाचा तरी आदर ठेवायला हवा होता.  वाघ्याला उखडून टाकल्यामुळे शिल्पकार दु:खी झाले नसतील काय? त्यांचा विचार कोणी केला आहे का?
एखादा पुतळा किंवा वाघ्या हटविला म्हणजे इतिहास बदलतो काय? तसे असेल तर ते खुशाल करावे. मात्र, ज्याचा काहीच  समाजाला उपयोग होत नाही. मात्र, त्याचा सर्वांना उपद्रव होतो. इतिहास बदलण्यासाठी क्रांतीकारक विचार पेरायला लागतात. क्रांती घडेल असे काहीतरी करावे लागते. केवळ दादागिरी आणि तोडफोड करून इतिहास बदलता येत नाही. नव्या पिढीला तोडफोडीचा वारसा देणार का?  इतिहास हा मनात कोरला गेला आहे. तो वाघ्याला उखडून टाकल्याने बदलत नाही किंवा मनातून हद्दपार होत नाही.  तर दुसरीकडे वाघ्याला उखडल्याने सरकार चांगलेच अडचणीत सापडले.  त्यामुळे मला पुन्हा जागच्या जागी बसविले आणि जागता पाहारा ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. एकीकडे दहशतवादी कारवाय

First Published: Thursday, August 9, 2012 - 13:43
comments powered by Disqus