'शाळा'... चला शाळेत जाऊया.....

रोहित गोळे "त्या दिवशी मला कळलं की, शाळेची मजा कशात आहे ते. इथं वर्ग आहेत बाकं आहेत, पोरं पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्रसुद्धा. पण आपण त्यात कशातच नाही. यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते खास एकट्याचीच."

Updated: Jun 16, 2012, 04:31 PM IST

रोहित गोळे

www.24taas.com, मुंबई

 

"त्या दिवशी मला कळलं की, शाळेची मजा कशात आहे ते.... इथं वर्ग आहेत बाकं आहेत,  पोरं पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्रसुद्धा.. पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गायींच्या पाठीवर बसणाऱ्या पाढंऱ्या पक्षासारखें अगदी मुक्त आहोत... यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते  खास एकट्याचीच.... त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाही. पण त्यातलं शिकणं फार सुंदर...."

 

शाळा.... पुस्तकातंलं हे सुदंर असं वर्णंन... आज  शाळा म्हटलं की आठवते ती फक्त शाळा सिनेमातील 'शिरोडकर'... पण असं नाहीये मित्रांनो.. आजपासून शाळेला सुरवात झालेली आहे... शाळा पुस्तकात लेखकाने जसं म्हटलं आहे... की, 'आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते खास एकट्याचीच..' हे तंतोतंत खरं आहे.. दोन अडीच महिन्याच्या सुट्टीनंतर ओढ लागते ती शाळेची.... आठवडाभर शाळेची सगळी खरेदी करण्यातच आपला वेळ जात असतो... शाळेचा नवा ड्रेस, नवी पुस्तकं, नव्या वह्या... हे खरेदी करणं म्हणजे तर आपल्यासाठी एक खास पर्वणीच ं असते... आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे... त्या नव्या पुस्तकांचा येणार विशिष्ट सुगंध....

 

खरी मजा असते ती म्हणजे शाळेच्या जाण्याच्या दिवशी... पावसाचं मंदधुदं करणारं वातावरण... नव्या छत्र्या, रेनकोट घेऊन आपण सज्ज झालेलो असतो. ते शाळेत जाण्यासाठी.... आपला वर्ग कुठला असणार?... वरच्या मजल्यावर असणार की, खालीच असणार?... कोणत्या बाकावर बसायला मिळणार... मागे बसायला मिळालं तर चागंलचं... वर्गशिक्षिका कोण असणार?... आपल्या वर्गाचं वेळापत्रक कसं असणार? पीटीचे किती पिरेड असणार? यासारखे अनेक प्रश्न मनात रुंझी घालत असतात... यासारख्या प्रश्नांचा विचार करतच शाळा गाठलेली असते...

 

शाळेत गेल्यावर दोन महिन्याच्या सुट्टीनंतर भेटलेले मित्र आणि मैत्रीणी यांच्या गराड्यात जाऊन आपण सामील होतो. दोन महिन्यात घडलेल्या अनेक गोष्टीनी वर्गभर चिवचिवाट सुरू असतो.... या सगळ्या वातावरणात आपण इतके गढून जातो कि, या शाळेपलीकडे आपलं काही विश्व आहे हे देखील विसरून जातो. प्रत्येक पिरेडला येणाऱ्या नव्या मॅडम आणि सर यांच्याकडे लक्ष लागून राहिलेलं असतं. त्यात शाळेत काही नवे चेहरेही दिसू लागतात... आणि मग त्या नव्या चेहऱ्यांकडे सहजच लक्ष जातं. त्यानंतर एखाद्या आवडत्या चेहऱ्याकडे चोरून लपून पाहणं पहिल्या दिवसापासूनच सुरू होतं. त्यामुळे शाळेची मजा काय असते हे त्या दिवसापासूनच लक्षात येतं. हळूहळू अभ्यास यासाऱख्या 'दुय्यम' गोष्टीकडे माझ्यासारखे विद्यार्थी लक्ष देऊ लागतात..

 

कारण की परीक्षानामक एक भयानक गोष्ट जवळ येतं असते. शाळा सुरू असताना तिचा फार कंटाळा यायचा... मैदानावर खेळायला कधी मिळतयं याकडे सतत लक्ष लागून राहिलेलं असायचं. मात्र आता जाणवतयं शाळेची मजा काही औरच होती.. ते वर्ग ती बाकं.... वर्गात केलेली मस्ती... मित्रांना दिलेला त्रास , मैत्रिणींना खट्याळपणे छेडणं.. हे सारं किती निरागस होतं.. आणि हिच खरी 'शाळा' होती. शाळेतल्या या गोष्टी पुन्हा करता येणं कधीच शक्य नाही... मात्र आज शाळा सुरू होतायेत यानिमित्ताने पुन्हा एकदा या जुन्या गोष्टीत हरवून गेलो. मनात असूनहूी शाळेत जातं येतं नाही हे मात्र खरं... कामाच्या गराड्यात शाळेबद्दल लिहता आलं यातच ं खरी धन्यता आहे.. 'शाळा'.... दोन शब्दात खूप आठवणी आहेत... माझ्या सारख्या तुमच्याही असतीलच की....