सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा

Last Updated: Friday, April 20, 2012 - 18:05

अमित जोशी 

हल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते. सर्वात म्हणजे रोजच्या कामाच्या गडबडीतून थोडंसं फ्रेश होण्यासाठी लोकं फिरण्यासाठी त्यापेक्षा ट्रेकसाठी वेळ काढणे जास्त पसंत करत आहेत.त्यामुळे ट्रेकचे प्रमाणे कितीतरी पटीने वाढले आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे.

पण किल्ले, लेणी किंवा निसर्गातील लपलेली सौंदर्यस्थळे विशेषतः सह्याद्रीच्या बाबतीत बोलयाचे झाले तर दुर्गम भाग असे काही आता फारसे राहिलेले नाही. यामुळे सर्वच ठिकाणी आता शनिवार-रविवारी गर्दी दिसून येते, त्या ठिकाणी बाजार भरल्यासराखं वाटतं. याचा अर्थ फक्त ट्रेकर्स लोकांनी या ठिकाणी जावे आणि आनंद लुटावा असा नाही. सांगायचा उद्देश हा की त्या ठिकाणचे वैशिष्ट्य किंवा वेगळेपण जाणून घेण्याच्या फंदात फारसे कोणी पडतांना दिसत नाही.

उदा.सर्वपरिचित कर्नाळा किल्ला. एक दिवसाच्या ट्रेकसाठी, नवख्यांसाठी, सर्व गटातील लोकांसाठी, मन फ्रेश करणारा एकदम सोपा आणि उत्तम असा ट्रेक. लोकं अभयारण्यात जातात, आरडाओरडा, गोंधळ करत त्यांची पिकनिक एन्जॉय करतात. कर्नाळा किल्ल्यावर जातात, थंड टाक्यातील पाणी पितात, क्वचित एखाद्यामुळे मधमाश्यांची पोळी डिस्टर्ब होतात, तेव्हा होणारी पळापळही अनुभवतात. मात्र हा  सुमारे १५० उंचीचा कर्नाळा सुळका निसर्गाने बनवला तरी कसा याचा कोण विचार करत नाही. कर्नाळा हे राज्यात पक्षीअभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र सध्या तेथे पक्षी शोधायला कष्ट पडतात एवढी त्यांची संख्या कमी झालेली आहे याकडे कोणी लक्ष देत नाही. कर्नाळा किल्ल्यावर येण्यासाठी आणखी किती वाटा आहेत याची कोणी चौकशी करत नाहीत.

थोडक्यात आज ट्रेक भरपूर होत आहे, ट्रेकर्सची संख्या वाढली आहे. मात्र  ट्रेकला जातांना वाकड्या वाटेचा, वाकड्या विचारांचा कोणी विचारच करतांना दिसत नाही. अर्थात खरा ट्रेक करणारा ह्याला अपवाद आहे. तो भटकंती करतांना नेहमीच वेगळ्या वाटा धुंडाळत असतो. प्रत्येक ट्रेकमध्ये नवीन काहीतरी मग ते स्वतःमधले ,भेट देणा-या ठिकाणामध्ये शोधत असतो. तो आनंद खरा ट्रेकर, गिर्यारोहक घेत असतो. असा वेगळा मार्ग निवडणा-या ट्रेकर्समध्ये एक वेगळी गोष्ट असते. ट्रेकर्सच्या भाषेत त्याला कंड किंवा खाज म्हणतात. तेव्हा या अशी कंड किंवा खाज असणा-या ट्रेकर्सना मनोमन सलाम ठोकत सह्याद्रीतील काही वेगळे ट्रेक किंवा वेगळ्या वाटा, त्याची वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. यापैकी काही ट्रेक मी केलेले आहेत, बरेचसे करायचे आहेत. तुम्ही काही वेगळ्या वाटा लिहिल्यात तर त्या मलाही माहित होतील.

 
बोरिवलीचे नॅशनल पार्क
नॅशनल पार्कला प्रत्येकजण एकदा का होईना गेला असेल.जाणा-यांपैकी अर्ध लोकं कान्हेरी लेण्यांपर्यंत जातात.  व्याघ्र-सिंह सफारी झाली, नौका विहार झाला, कान्हेरी लेणी बघितल्या की संपली आपली नॅशनल पार्कची सफर. मात्र  नॅशनल पार्कच्या विरुद्ध बाजूने म्हणजे मुलूंडच्या दिशेने कान्हेरी लेणीपर्यंत येण्यात वेगळी मजा आहे. साधारण तीन तासांची तंगडतोड एका चांगल्या मळलेल्या पायवाटेने करावी लागते. वाटेवर इंग्रजांनी एका टेकडीवर 1930 च्या सुमारास बांधलेला बंगला दिसतो. आजही बाथटप तिथे अस्तित्वात आहे. छप्पर उडालं असलं तरी भिंती आजही मजबूत आहेत. ह्याला भूताचा बंगला असेही म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंगल्यासमोर तुळशी तलाव, विहार तलाव, पवई तलाव आणि दूरवर हिरानंदानीच्या इमारती वातावरण स्वच्छ असेल तर सहज दिसतात. कान्हेरी लेणी इथून दीड तासाच्या चालीवर आहेत. थो

First Published: Friday, April 20, 2012 - 18:05
comments powered by Disqus