`के टू एस`... एक ट्रेक पूर्ण न झालेला!

एका अफलातून ट्रेकला जायची संधी मिळाली आणि तीही ‘कात्रज टू सिंहगड’… तब्बल १६ किलोमीटरच्या ‘नाईट ट्रेक’ची... पहिल्यांदा १६ किमी आणि १३ टेकड्या ऐकून जरा पोटात गोळा आला. पण...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 4, 2013, 08:25 AM IST


www.24taas.com
अश्विनी पवार
झी २४ तास, पुणे

ट्रेक म्हटलं की आठवण येते ती कॉलेजच्या दिवसांची... किती ट्रेक्स करायचो!!! किती भटकायचो यार तेव्हा... पण कॉलेज संपवून ग्रुपमधल्या सगळ्यांनी जॉब जॉईन केले आणि ट्रेकच्या भटकंतीवर पूर्णविराम लागला.... ‘या विकमध्ये बिझी आहे यार नेक्स्ट विकला जाऊ... पुढच्या महिन्यात पक्का....!’ असं करत करत नवीन ट्रेक करायचं दूरच पण आधी महिन्यातून एकदा पालथा घातला जाणारा साधा सिंहगडही कित्येक महिन्यात चढून झाला नव्हता... बऱ्याचदा फेसबुकवर आलेल्या ट्रेकचे इन्व्हिटेशन फक्त `मे बी जॉईन` एवढाच रिप्लाय करून सोडून दिलेलं...
पण, या सगळ्यातून एका अफलातून ट्रेकला जायची संधी मिळाली आणि तीही ‘कात्रज टू सिंहगड’… तब्बल १६ किलोमीटरच्या ‘नाईट ट्रेक’ची... पहिल्यांदा १६ किमी आणि १३ टेकड्या ऐकून जरा पोटात गोळा आला... पण, ऑफिसकडून जाण्याची संधी मिळतेय म्हटल्यावर आत्मविश्वासाने तयारीला सुरुवात केली.
पावसाने जणू काही आमची परीक्षाच घ्यायचं ठरवलं होतं... आठवडाभर तो अगदी न कंटाळता संतत पडत होता... आणि कित्येक वर्षांनी माझ्या ट्रेकच्या मुहूर्ताला तो जणू काही चॅलेंजच देत होता. पण, आम्हीही हार मानणारे नव्हतो. पूर्ण तयारीनिशी ट्रेकला सुरवात केली... मी , अरुण सर, आमचे कॅमेरामन नितीन, विकी आणि मुंबईवरून आलेले शुभांगी, रोहीत अशा आमच्या टीमने इतर मिडिया टीम्स सोबत रात्री आठ वाजता कात्रजच्या टेकडीवरून ट्रेकला सुरुवात केली. ट्रेकिंगबरोबरच रिपोर्टींगही करायचं होतं... सुरुवातीचा प्रवास शॉटस् घेणं घेणं, आमच्या बरोबरच्या ट्रेकर्सचे बाईट्स घेणं यामुळे थोडा फार आरामदायी झाला. पण, पहिल्या दोन टेकड्या पार करता करताच धाप लागली... आणि आम्ही कॅमेरे बॅग मध्ये ठेऊन आता फक्त ट्रेककडे लक्ष द्यायचं ठरवलं... याआधी ‘के टू एस’चा अनुभव घेतलेले सहकारी सूचना देत होते आणि आम्ही त्याचं पालन करत होतो.

तास दीड तासाचा प्रवास झाला आणि पावसाला सुरुवात झाली. रात्रीचा काळाकुट्ट अंधार... पावसाने निसरड्या झालेल्या पायवाटा... त्यातच आमच्याआधी जवळ जवळ ३०० ट्रेकर्स नि त्यांनी तिथूनच मार्गक्रमण केल्याने झालेला चिखलमय निसरडा रस्ता... वरून पाऊस... अशा कचाट्यात सापडलेले आम्ही टॉर्चच्या साहाय्याने चिखल तुडवत, घसरत, अडखळत, प्रसंगी कपाळमोक्ष करत का होईना टेकड्या पार करत होतो. निम्म्या टेकड्या पार केल्यानंतर बरोबर असणारे सर्व ग्रुप्स विखरले काही जण मागे, तर काही पुढे, तर अनुभवी लोकांनी तर अगदी शेवटची टेकडी गाठली.
सगळ्यात मागे राहिलेल्या टीममध्ये मी होते... आमच्या आधी सुरुवात केलेल्या बऱ्याचशा कॉलेजेसच्या टीम्स तर ‘आता उद्या सकाळीच काय ते पाहू’ असं म्हणत रस्त्यातच बसकण मांडून बसत होत्या. त्यांना पाहून आता आपल्याला शेवटची टेकडी पार होणार का? अशी शंका येत होती. परंतु मधून बाहेर पडायला पर्यायच नव्हता. त्यामुळे हळूहळू चालणं सुरु ठेवलं. मधूनच पुढे गेलेल्या टीमच्या टॉर्चची रांग दिसत होती. ‘बापरे! अजून एवढ्या टेकड्या बाकी आहेत?’ असं वाटून वेग वाढत होता. पण चिखलाने निसरड्या झालेल्या वाटांमुळे पुन्हा कमी होत होता. दूरवर दिसणाऱ्या सिंहगडावरच वरचा लाईट मधेच जवळ तर मध्ये अगदी दूर असल्याचा भास होत होता. जेवढी अवघड टेकड्यांची चढण होती, त्यापेक्षा अवघड उतरण होती. कधी एका बाजूला उंच चढण तर दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. आपल्या कात्रजमध्ये पण इतके दुर्गम डोंगर आहेत हे आजच समजत होतं. शेवटची टेकडी चढून आलो तर अरुण सरांसह मीडियातले सगळेच जण आमची वाट पाहत थांबून होते. आम्हाला सुखरूप पाहिल्यावर त्यांना हायसं वाटलं आणि पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला.
पहाटे ‘के टू एस’च्या दुसऱ्या टापूवर आम्ही पोचलो. तेव्हा दिवस उजाडायला लागला होता. धुक्याची दुलई घेतलेला सिंहगड नजरेत आला पण तो सर करण्यासाठी आम्हाला अजून तीन टेकड्या उतरून सुरुवात करावी लागणार होती. रात्रीचा ट्रेक दिवसा करण्याची इच्छा कोणलाच नव्हती. कारण रात्रभर चालून सगळ्यांचीच अवस्था पाहण्यासारखी झाली होती. चिखलात पडून बॅग, शूज आणि कपड्यांवरही चिखल माखला होता. इतक्या वेळ न जाणवणारे हात आणि पाय आता चांगलेच दुखू लागले होते. त्यामुळे सर्वानुमते इथूनच माघार घ्यायच ठरलं आणि आमचा ट्रेक अर्धवट राहिला.
गाडीतून परत येताना पावसाळी ढगांचा शिरपेच घातलेला सिंहगड जणू आम्हाला पाहून जणू उपदेशच करत होता. ‘मला सर क