बंड्याचे `टोल मोल के बोल`

काय राव, आपण आज फूल टू नाराज झालोय, कारण आपल्या साहेबांचं आंदोलन पाच तास पण नाही चाललं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 12, 2014, 07:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काय राव, आपण आज फूल टू नाराज झालोय, कारण आपल्या साहेबांचं आंदोलन पाच तास पण नाही चाललं.

वाटलं होतं, आज तोडफोड डे, पण साहेबांनी सांगून टाकलं शांतता.....टोल आंदोलन सुरू आहे!, नाही तर आपलं कायमचं एकच फाइट वातावरण टाइट... पण काय हे तोडफोड पण नाही...आणि पोलिसांच्या चौकश्याही नाही.
नाहीतर, १२ तारखेला तोडफो़ड डे, मार खाऊन १३ तारखेला जामीन डे, आणि १४ फेब्रुवारीला मार खाल्ला असता तर ठरला असता व्हॅलेटाइन, नाही तर मलम डे.
पण सर्व प्लान चौपट, ना पोलिसांचा मार, ना त्यावर आपल्या छावीने लावायला ना मलम, मार आपण अभिमानाने खातो आपल्या साहेबांसाठी.
नाहीतर कुणासाठी आपण साधा शब्द पण टाकत नाही, कुणाला पण इचारा, बंड्या कसाय.
आज सकाळी मस्तपैकी पांढरे कपडे-बिपडे घालून आपण आंदोलनाला तयार होतो, पण...जाऊ द्या राव आज नशिबातच नवतं काय.
आजचे पांढरे कपडे आता वापरणार आपण थेट २१ फेब्रुवारीला, ते पण मोर्चाचं निश्चित झालं तर... उद्या साहेब आणि बाबांमध्ये ‘चाय पे चर्चा’ होणारयं तिथंच काय ते ठरणार आपण पांढरे कपडे घालणार की नाय...

तसे आपण कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही बरं का. आपण मुद्दा बघून मोर्चात सामिल होतो. जिथं चर्चा तिथं आपला मोर्चा... असा आपला फंडा....
आपल्याकडे तशी फोर व्हिलर बिलर काही नाही, पण टोलला आपला विरोध आहे आणि टोल चुकीच्या पद्धतीने घेतला जातो, असं म्हणतात, त्यामुळे आपला विरोध फुकट आहे, असंही म्हणता येणार नाही.
तिकडे दादा म्हनले म्हणे, काही राजकीय पक्षांचं भान सुटत चाललंय. पण त्यांनाही ‘धरण’ दिसलं की, त्यांचंही काहीही ‘सुटतं’ याचं त्यांना भान राहत नाही, त्याचं काय?
कसं आहे, नाकापर्यंत पाणी आलं की सर्व आठवतं, आणि पाणी ओसरलं की काहीच नाही, बरोबर की नाही.
आता साहेब करतील म्हणे, उद्या चर्चा, आपण पण मोर्चात जायचं की नाही, ते चर्चेच्या मुद्यावर ठरवणार.
आंदोलनासारखा आपला फ़़ॉमपण उतरलाय, आता तयारी आहे आपली व्हॅलेटाईनची.
तर पुन्हा भेटू या पुढच्या भागनडीत....
आपला फंडू झेंडू.... बंड्या

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.