अंदाज ४८ मतदारसंघांचे... ईव्हीएममध्ये दडलंय काय?

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, May 6, 2014 - 18:57

धनंजय शेळके, असोसिएट प्रोड्यूसर, झी २४ तास.
dhananjay_29sep@yahoo.com
राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे ला आहे. त्याआधीच आमचे रिपोर्टर, इतर काही व्यक्ती आणि झालेलं मतदान, प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणे यावरुन मी काही अंदाज वर्तविले आहेत. हे अंदाज आहेत. त्यामुळे चुकूही शकतील. मात्र बहुतेक अंदाज हे बरोबर येतील असा विश्वास वाटतोय.
विदर्भ – एकूण जागा १०
- महायुती – ७ ते ८ जागा
- आघाडी – २ ते ३ जागा
1)गडचिरोली – काँग्रेस किंवा भाजप
2)भंडारा गोंदिया - राष्ट्रवादी
3)चंद्रपूर – भाजप
4)नागपूर – भाजप
5)रामटेक – शिवसेना
6)वर्धा – काँग्रेस
7)अकोला – भाजप
8)यवतमाळ वाशिम - शिवसेना
9)अमरावती – शिवसेना किंवा राष्ट्रवादी
10)बुलढाणा – शिवसेना किंवा राष्ट्रवादी
विदर्भातील १० मतदारसंघापैकी यावेळी महायुतीला ७ किंवा ८ तर आघाडीला २ ते ३ जागा मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये वर्धा, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या जागा आघाडीला लागण्याची शक्यता आहे. किंवा याच्यातली एखादी जागा महायुतीकडे गेल्यास बुलढाणा किंवा अमरावती यापैकी एखादी जागा आघाडीकडे जाऊ शकते. २०१४ मध्ये आघाडीकडे पाच आणि महायुतीकडे ५ अशा जागा होत्या. यावेळी विदर्भात महायुती मुसंडी मारण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
1)नांदेड – काँग्रेस
2)परभणी – राष्ट्रवादी
3)बीड – राष्ट्रवादी किंवा भाजप
4)हिंगोली – काँग्रेस किंवा शिवसेना
5)उस्मानाबाद – शिवसेना
6)लातूर – भाजप
7)जालना – भाजप
8)औरंगाबाद – शिवसेना किंवा काँग्रेस
खरंतर मराठवाड्यात यावेळी नांदेडची जागा सोडली तर ठामपणे कोणती जागा कोणाकडे जाईल असं सांगणं फारच कठीण झालेलं आहे. तरीही अंदाज व्यक्त करायचा म्हटल्यास मराठवाड्यातील ८ जागांपैकी गेल्यावेळी प्रमाणेच पाच तीन असं समींकरण कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. यावेळी नांदेड, परभणी आणि बीड किंवा हिंगोली किंवा औरंगाबाद या जागा आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
1)पुणे – भाजप किंवा काँग्रेस
2)शिरुर – शिवसेना
3)मावळ – शिवसेना किंवा शेकाप
4)बारामती – राष्ट्रवादी
5)सातारा – राष्ट्रवादी
6)सांगली – काँग्रेस
7)कोल्हापूर – राष्ट्रवादी
8)हातकणंगले – काँग्रेस
9)सोलापूर – काँग्रेस
10)माढा – राष्ट्रवादी
11)अहमदनगर – राष्ट्रवादी
12)शिर्डी - शिवसेना
राज्यातल्या सगळ्या विभागात आघाडीला फटका बसत असताना पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला काहींस दिलासादायक चित्र दिसतंय. आघाडी स्वतःच्या जागा तर टिकवेलच शिवाय महायुतीच्या काही जागा खेचून आणेल असं दिसतंय.
उत्तर महाराष्ट्र
1)नाशिक – राष्ट्रवादी किंवा शिवसेना
2)दिंडोरी – भाजप
3)धुळे – काँग्रेस
4)जळगाव – राष्ट्रवादी
5)रावेर – भाजप
6)नंदूरबार – भाजप किंवा काँग्रेस
उत्तर महाराष्ट्रात आघाडी आणि महायुती बरोबरीत राहील अशी शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि कोकण
मुंबईतही काहीचं अनिश्चित चित्र आहे. उत्तर मुंबई वगळता कोणत्याही मतदारसंघाचा अंदाज वर्तवण अवघड आहे. तरीही साधारणपणे
1)दक्षिण मुंबई – काँग्रेस
2)दक्षिण मध्य मुंबई – शिवसेना
3)उत्तर मध्य मुंबई – काँग्रेस
4)उत्तर पश्चिम मुंबई – शिवसेना किंवा काँग्रेस
5)उत्तर पूर्व मुंबई – भाजप
6)उत्तर मुंबई - भाजप
7)ठाणे – राष्ट्रवादी
8)कल्याण – शिवसेना
9)पालघर – बहुजन विकास आघाडी
10)भिवंडी – काँग्रेस
11)रायगड – राष्ट्रवादी
12) रत्नागिरी- सिंधुदुर्ग – शिवसेना
राज्याचा विचार केल्यास
भाजप – १३ ते १५
शिवसेना – १३ ते १५
थोडक्यात महायुतीला २८ ते ३० जागा मिळतील.
काँग्रेस – ११ ते १२
राष्ट्रवादी – ९ ते ११
आघाडीला १८ ते २२ जागा मिळतील असा अंदाज आहे.
मनसेला मिळालीच तर कल्याणची जागा मिळण्याची शक्यता आहे.
शेवटी पुन्हा एकदा सांगतो हे अंदाज आहेत. बरोबर येतील असा विश्वास आहे. मात्र चुकूही शकतात. बरोबर आले तर पाठ थोपटा, चुकले तर माफ करा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*

First Published: Tuesday, May 6, 2014 - 18:48
comments powered by Disqus