फिल्म रिव्ह्यूः सलमानची ‘किक’ला ‘धूम’ फिल!

Last Updated: Friday, July 25, 2014 - 21:06
फिल्म रिव्ह्यूः सलमानची ‘किक’ला ‘धूम’ फिल!

जयंती वाघधरे, प्रतिनिधी झी २४ तास : सलमान खान स्टारर किक हा सिनेमा बिग स्क्रिनवर दाखल झालाय.. साऊथच्या तेलगू 'किक' या सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.. सिनेमा पाहताना आपल्याला आपण धूम सिरीझमधला एखादा सिनेमा पाहतोय असा फिल येतो.. 

काय आहे कथा

मेरे बारेमे इतना मत सोचना.. मै दिलमे आता हू, समज मे नही.. सिनेमातल्या या डायलॉगप्रमाणेच रिअल आणि रिल लाइफमधला सलमान एकदम फिट वाटतो.. देवीलाल सिंग नावाच्या एका तरुणाची ही गोष्ट आहे..  ज्याला एक थ्रिलिंग आयुष्य जगण्याची सवय असते.. त्याला प्रत्येक गोष्टीत एका किकची गरज लागते.. या किकशिवाय त्याच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असा काहीसा विचार करणारा हा देवीलाल असतो. सलमाननं साकारलेला देवीलाल सिंह एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तिमत्व आहे.. जॅकलिननं साकारलेल्या शायनावर देवीलालचं प्रेम असतं.. मग अचानक एक दिवस असं काहीतरी घडतं की देवीलालला डेविल व्हावं लागतं.. देवीलाल ते डेव्हील त्याचा हा प्रवास, त्याच्या या प्रवासात आलेल्या असंख्य अडचणी आणि त्या अडचणींवर सतत मात करणारा हा डेव्हील.. सिनेमाचा फर्स्ट हाफ अगदीच वॉन्टेड, दबंग आणि रेडी सारखा वाटतो तर सेकंड हाफ हा आपण धूम सिरीज मधला एखादा सिनेमा पाहतोय की काय? असं जाणवतं.

कसं आहे दिग्दर्शन:
साजिद नाडियादवाल दिग्दर्शित हा एक अक्शन थ्रिलर सिनेमा आहे.. सिनेमात जर सलमान फॅक्टर आहे, तर सिनेमा हिट करण्यासाठी सलमानचा वापर कसा करायला हवा, प्रेक्षकांना अपील करण्यासाठी काय करायला हवं याचं पूर्ण भान दिग्दर्शक साजिद नाडीयादवाला यांना आहे.. किकमध्ये सलमानचा पूरेपूर वापर करण्यात त्यांना नक्कीच यश आलंय.. हा एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम आहे जो ब-रापैकी वर्क करुन जातो..  सिनेमाचा फ्लो एकदम स्मूथ आहे आणि त्याची हाताळणीही साजीदनं परफेक्ट निभावली आहे..

कसा आहे अभिनय:

सलमान आणि त्याची जादू कधीच न संपणारी वाटते.. त्याचा बिग स्क्रिनवरचा वावर, त्याचा प्रेझेन्स लाजवाब आहे.. 

सलमान - सलमान आणि केवळ सलमान फॅक्टरवर आधारीत हा सिनेमा आहे. सलमानचा मँचो अंदाज, त्याची टिपीकल स्टाईल, त्याचे सिगनेचर डान्स स्टेप, त्याची डायल़ॉगबाजी अशा अनेक गोष्टीचा समावेश या सिनेमात आपल्याला पहायला मिळतो.. सलमानचा बिंधास्तपणा, त्याच्या दबंग स्टाईलनं परीपूर्ण असा हा सिनेमा.. चुलबुल पांडे असो किव्हा देवीलाल सिंह, सलमान त्याची स्टाईल आणि त्याचा अभिनय यात काहीही बदल वाटत नाही पण तरीही तो आणि त्याचा पड्यावरचा वावर खूपच अपिलिंग वाटतो..

जॅकलिन -  एक गोड मुलगी, एक प्रमाणिक सायकोलॉजिस्ट अशी शायना नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा  जॅकलिन फर्नांडिसनं यात बजावली आहे. जॅकलिनची अदा, तिचा अभिनय यात बरा आहे, असं म्हणायला हरकत नाही.. काही ठिकाणी डायलॉग डिलेव्हरी करताना तिच्या हिंदीचा प्रॉब्लेम जाणवतो आणि तिथेच कतरिनाची आठवण येते..

रणदीप हुडा - या सिनेमातला रणदीप हुडा पाहताना तुम्हाला धूम सिरीझ मधल्या अभिषेक बच्चननं साकारलेल्या इन्पेक्टर जय दीक्षितची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.. असंच काहीसं कॅरेक्टर त्यानं यात साकारलं आहे. त्याची भूमिका त्यांनं उत्तमरित्या पार पाडली आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकी - अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, अमजद खान सारख्या क्लासिक व्हिलनची आठवण करुन देणारं एक कॅरेक्टर अभिनेता नवाजुद्दीननं यात साकारलं आहे.. नवाजुद्दीननं साकारलेला विलन काही औरच आहे.. किक मधल्या त्याच्या प्रत्येक डायलॉग वर, त्याच्या एका टिपिकल नेगेटीव्ह पद्धतीनं हसण्यावर.. तो प्रेक्षकांच्या शिट्या आणि टाळ्या सहज मिळवेल.. त्याच्या प्रत्येक सीनमध्ये एक वेगळाच नवाजुद्दीन बघायला मिळतो.. त्यानं त्याची भूमिका चोख बजावली आहे..

कसं आहे संगीत
हिमेश रेशमिया, मीट ब्रदर्स आणि योयो हनी सिंगनं किक या सिनेमाला खूप छान गाणी दिली आहेत.. सलमानच्या आवाजातलं हँगओव्हर, जुम्मे की रात है ही सगळी गाणी खरंतर सिनेमा रिलीझ होण्याआधीच हिट झालीयेत.. या सिनेमात नर्गीस फाकरिननं एक आयटम साँग केलंय.. यार ना मिले ते मरजावा असे या गाण्याचे बोल आहेत.. गाणी नक्कीच पेपी आणि फूट टॅपिंग वाटतात..

या सिनेमाला रेटिंग -

या सिनेमातल्या सलमानसाठी, नवाजुद्दीन सिद्दिकीच्या माइंड ब्लोइंग अक्टिंगसाठी, सिनेमातली गाणी, अक्शन सिन, आणि डायलॉग या सगळ्या गोष्टी पाहता आपण या फिल्मला देतोय 3 stars..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Friday, July 25, 2014 - 20:34
comments powered by Disqus