लसलसणारी पुरुषी लांडगेवृत्ती....

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, February 1, 2013 - 15:52

अजित चव्हाण, झी २४ तास, वृत्तनिवेदक
‘लगता है छिनाल है साली’.... लोकलच्या पहिल्या वर्गाच्या महिला डब्यात शिरलेली फाटक्या कपड्यातली स्टेशन परिसरात फिरणारी पाच सहा छोटी–छोटी मुलं त्याच डब्यात बसलेल्या माझ्या एका मैत्रिणीकडे बराच वेळ बघत मानखूर्द स्टेशनला उतरली. उतरतांना आणि त्यांच्यातल्या जरा मोठ्या वाटणा-या एकाने तिच्याकडे बघत दुस-याशी केलेला हा संवाद ...एक शूट संपवून धावत पळत मेकअप न काढता कुर्ला स्टेशनवरून घरी जाण्यासाठी गाडीत बसलेली ती तिच्या चेह-यावर मेकअप तसाच राहिला त्याच मेकअप कडे बघत इतर मुलांपेक्षा जरा लवकरच जगाचा खरा चेहरा कळू लागलेल्या रस्त्यावरच्या मुलाची ही प्रतिक्रीया ...खूप काही सांगून जाणारी दुस-या दिवशी हा प्रसंग मला सांगताना तिच्या डोळ्यातल आश्चर्य, काळजी, संताप खरं तर संताप जास्तच पत्रकार आणि त्यातही वास्तव जवळून बघणारी अन्याय बघताच इतरांपेक्षा फार लवकर पेटणारी ती आणि ....छिनाल लगती है साली... हे तिच्या डोक्यात सारखे धुमणारे शब्द त्यानं ती जरा जास्तच अवस्थ झाली.. मुंबईसारख्या शहरात जिथं महिला खूपच सुरक्षित आहेत असं म्हटलं जात तिथं ८ /१० वर्षाच्या लहान पोराच्या तोंडून एकलेला हा शब्द ...पुरूष जातीची मानसिकता स्पष्ट करणारा होता.
खरंतर वयानं फार लहान असणारी मुलं आसपास दिसेल त्याचा त्यांच्या मनावर फार चटकन परिणाम होतो. मग तो बोलले त्यात वाईट काय? कारण मेकअप केलेली त्याच्यालेखी कोण ते वेगळं सांगायला नकोच, नाहीतरी एका वरिष्ठ आएएस अधिका-याची उच्चशिक्षित मुलगी मुंबईतल्या वडाळ्यासारख्या भागात बलात्काराच्या प्रयत्नात एका काश्मिरी वॉचमनकडून मारली गेलीच नसती. कमी कपडे घालते मोकळी वागते म्हणजे ती पटकन वश होईलच हा घाणेरडा विचार त्याच्य मनात आला. पण त्यातही तिच्या तोकड्या कपड्यांत वावरण्यानं तो पागल झाला आणि त्याच्या हातून हे कृत्य घडल असा उल्लेख बातमीत येतोच आणि घराघरातल्या तरूण मुलींसमोर ते मुद्दांम वाचून दाखवल जात किंवा ‘का घालायचे असे कपडे गेला ना जीव’ असा टोमणा एकल्यानंतर संतापणाऱ्या माझ्या अनेक मैत्रिणी दिल्लीच्या गँगरेपनंतर तर फारच अस्वस्थ झाल्यात अनेकींनी तावातावानं शिव्याशाप दिले, ‘तीला’ कशा वेदना देत देत ते हरामखोर छळले याचा विचार करून माझाही संताप होतो, मात्र आज महिन्यांने काय होतय?
दिल्लीच्या गँगरेप प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षिततेबद्दल बराच काथ्याकूट झालाय तरीही अजूनही गँगरेपच्या हेडलाईन्स कमी होत नाही आहे. हां.. रेपच्या बातम्यांच महत्व मात्र फारच वाढलय बाकी छेडछाड, विनयभंग हे तर किरकोळ विषय,खूप विचार केला का कशामुळं हे थांबत नाही त्याच एक कारण म्हणजे बाईला आपण कायम उपभोगाची वस्तू समजत आलो आहे. पिढ्यांन-पिढ्या बाईची, मुलीची छे़ड काढणं म्हणजे पुरूषार्थ मज्जा, गंमत जरा, जाम कंडा माल है यार! कडक आहे राव पाखरू! फाकडू आहे साली! अशी वाक्य उच्चारत एकत आणि मग तेच बोलत मोठी होणारी मुल, काय करेल नाहीतर साली? जाईल कुठे? अस म्हणत पुरूषी मानसिकता जपत छेडछाड न करणे म्हणजे हिजडेगिरी अशा आविर्भावात जगतात.

५ किलोमिटर चालत जाऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीपासून ते आयसीएसी बोर्डात शिकणाऱ्या दरवर्षी फॉरेन ट्रिप करणा-या इंटरनॅशनल एअरलाईन्सन एकट्या प्रवास करणाऱ्या मुलींनाही एखाद्या बुद्रुक-खुर्द गावापासून ते एअरपोर्टपर्यंत याचा अनुभव येतोच कारण....सोप्प आहे कुणी काहीच बोलत नाही आणि सबकुछ चलता है सब बिकता है अशी वृत्ती टीव्हीवरच्या डेलीसोप किंवा रियालिटी शो मध्ये एखादी नवीन मुलगी बघितली की? ती कोण आहे तिची कौटुबिक पार्श्वभूमी काय? याचा विचार न करता थेट पी.ए. ला इसका कोऑर्डीनेटर कौन है यार आएगी क्या? क्या रेट है पूछ तो जरा असं विचारणारे मस्तवाल, आना यार अपना खंडाला का बंगला है जरा रिलँक्स करेंगे अशी मानसिकता असणारे पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिला ठार मारल्याच्या संतापजनक बातमीवर ‘पर उसको क्या मजा आया होगा, यार फालतू मे मार डाला’ अशी किळसवाणी आणि संतापजनक प्रतिक्रीया देणारे सुध्दा या समाजात आहेत.
अशा हारमखोर लांडग्यांना एकच सांगावसं वाटत, तुमचा जन्मही एका स्त्रीच्या पोटातून झालाय हे कस विसरता रे? आणि हे सगळ पाहिल्यानंतर २१ व्या शतकात भरारी घेण्याच स्वप्न बाळगणाऱ्या सावित्रीच्या लेकींना एकच सांगावसं वाटत स्टेशनवरच्या त्या छोट्या मुलापासून मल्टिनॅशलमधल्या स्त्रीलंपट ब़ॉस पर्यंत कितीही आव्हाने आली तरी तुम्

First Published: Friday, February 1, 2013 - 15:49
comments powered by Disqus