मॉन्सून विकेन्डमध्ये : मालवण बीच

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, August 17, 2013 - 14:54

www.24taas.com झी मीडिया, सिंधुदुर्ग
मॉन्सूनमध्ये विकेन्ड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळते. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बीचची ओळख करू घेणार आहेत. निसर्ग संपन्न मालवणला लाभलाय तो निळाशार निळा समुद्रक्रिनारा.
या निळ्याशार समुद्राबरोबच अस्सल मालवणी जेवणाची सोबत असेल तर. असा फक्कड बेत या विकएंडला हौशी लोकांनी आखलाय. विकेएंडला लागून आलेल्या सुट्टीमुळे ही मजा पर्यटक लुटताना दिसतायत.
विकएंडला जोडून आलेल्या सुट्टयामुळे पर्यटकांनी कोकण गाठलंय. फेसाळणारा निळाशार समुद्र किनारा आणि मालवणी जेवणाची खमंग मेजवानी. त्यामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी वाढलीय. तारकर्लीचे एमटीडीसीचे २६ समुह पर्यटकांनी चार दिवसांसाठी आगाऊ बुक केलेत. इतर रिसॉर्टमध्येही हीच परिस्थिती आहे.
पूर्वी फक्त उन्हाळ्यात कोकणात पर्यटकांची गर्दी वाढायची. आता पावसाळ्यातही पर्यटक कोकणला भेट देणं पसंत करतायत.
इथं पोहचणार कसं...
मुंबईतून रेल्वेने तसेच बाय मुंबई-गोवा महामार्गावरून बसने सिंधुदुर्गला जाता येते. रेल्वेने कणकवली, सावंतवाडीला जायचे. तेथून बस किंवा खासगी गाडीने बीचवर जाता येथे. भटकंती करणाऱ्यांसाठी हे एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे. केवळ मालवणला न जाता तारकर्ली, आंबोली, वेंगुर्ला बीच या ठिकाणी जाण्याचा बेत आखला तर आखणीच मजा येत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013 - 14:54
comments powered by Disqus