सणसणीत कानाखाली!

“यापुढे सिनेमात महिलांना थोबाडीत मारायची दृश्यं दाखवण्यास सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे...” असिस्टंटने शुभवर्तमान कळवलं. बातमी सांगताना त्याचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा झाला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 4, 2013, 03:45 PM IST

आदित्य नीला दिलीप निमकर
कॉपी रायटर, www.24taas.com
“सर, सर बातमी पाहिलीत का?”
एक गोंधळलेला भांबावलेला असिस्टंट नामांकित, प्रथितयश अशा आपल्या दिग्दर्शकाला भेटून सांगू लागला. दिग्दर्शक आपल्या प्रगल्भ आणि विचारी नजरेने असिस्टंटकडे पाहू लागला. मोठ्या प्रयत्नांनी दिग्दर्शकाने ही नजर कमावलेली होती. इतर वेळी हिरोइन्सकडे आशाळभूत नजरेने पाहाण्याचाच त्याच्या डोळ्यांना सराव असावा. आपल्याला ब्रह्मज्ञान असल्याचा जरी दिग्दर्शकाने आव आणला असला, तरी त्याने असिस्टंट सांगत असलेली बातमी पाहिली नसल्यामुळे जरा गोंधळच उडाला होता.
“कुठली बातमी?”- दिग्दर्शक
“सेन्सॉर बोर्डाची...”- असिस्टंट
सेन्सॉर बोर्डाला टाळं लावण्यात येतंय की काय अशी शंका दिग्दर्शकाच्या मनात डोकावली आणि आतल्या आतच त्याला गुदगुल्या झाल्या. पण बातमी भलतीच होती.
“यापुढे सिनेमात महिलांना थोबाडीत मारायची दृश्यं दाखवण्यास सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे...” असिस्टंटने शुभवर्तमान कळवलं. बातमी सांगताना त्याचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा झाला होता. बातमी ऐकून दिग्दर्शकच्या चेहऱ्यावर जे भाव अवतरले, ते सराईत हिरोही आणू शकणार नाही असे होते. काहीसा तुच्छतापूर्वक, काहीसा वैतागल्यासारखा असे अनेक भाव चेहऱ्यावर एकत्र आणत दिग्दर्शक गूढ हसला. (म्हणजे नेमका कसा? साधारण राहुल गांधींचं नाव काढलं की भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर कसे भाव असतात... किंवा नारायण राणेंचं नाव काढल्यावर उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर जसे भाव असतात... किंवा नरेंद्र मोदी सोडून इतर कुठल्याही नेत्याचं नाव काढलं की राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर जसे भाव असतात तसे...)

“अरे भाई, बरोबर आहे.. स्त्रिया या थोबाडीत खाण्यासाठी नसून पुरुषांनी त्यांच्यावर प्रेम करावं यासाठी असतात...” ऑस्कर वाइल्डचं कुठलंतरी वाक्यं आपल्या थाटात मारत दिग्दर्शकाने आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेची छाप भेदरलेल्या असिस्टंटवर पाडली.
“पण सर, आता आपल्या सिनेमाचं काय?” असिस्टंटने घाबरून विचारलं?
“का?”- दिग्दर्शकाने त्याच पट्टीत प्रश्न केला.
“आपल्या सिनेमात हिरोइनच्या ८ वेळा थोबाडीत मारल्याची दृश्यं आहेत.” असिस्टंटचा संयम संपत आला होता.
दिग्दर्शकाचा खरंतर गोंधळ उडाला होता. सिनेमात हिरोइन्सच्या किसिंगचे सीन्स किती आहेत, याचाच हिशेब त्याच्याकडे होता. याच आकड्यांचा वापर सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी करायचा बेत त्याने आखला होता. आता खरंच दिग्दर्शकाला आपल्या चेहऱ्यावरचे अभ्यासू भाव टिकवणं अशक्य झालं. यापूर्वी सेन्सॉरने तमाम शीला,मुन्न्या, अनरकल्या, चमेल्या, बबल्यांना परवानगी देऊन आता त्याच्या सिनेमातील ‘रसाळ रसिली’ या आयटम साँगला ‘गचाळ रसिली’ म्हणत टीव्हीवर दाखवण्याची परवानगी नाकारली होती. सिनेमातला सर्वांत जास्त खर्च याच गाण्यावर खरंतर झाला होता. महागडी आयटम गर्ल आणि (वीतभर असले तरी) तिच्याहून महाग असणारे कपडे यावर खर्च करताना निर्मात्याचे डोळे पांढरे झाले होते. निदान हे गाणं टीव्हीवर दिसलं, की लोक मोठ्या पडद्यावर हे गाणं पाहायला येऊन त्यांचे डोळे पांढरे करता येतील आणि त्यातून आपलं उखळ पांढरं होईल, असा दिग्दर्शकाचा अंदाज होता. पण आता सेन्सॉरच्या कात्रीमुळे हे गाणं फक्त इंटरनेटवर दाखवणं शक्य होतं. त्यानंतर घोड्यावरून येणाऱ्या नायकाचे सीन्सही प्राणीमित्र संघटनांच्या दबावाला बळी पडत सेन्सॉरने कट केले होते. अश्लील दृश्यांना कलात्मकतेची झालर देण्याचा प्रयत्न अंगाशी आला होता. सेन्सॉरच्या कृपेने ‘दिग्दर्शकीय नजरे’ला दिसलेलं सिनेमातलं स्त्री सौंदर्य प्रेक्षकांना दिसणं अशक्य झालं होतं. आता सिनेमात दाखवायचं तरी काय असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला होता. तामिळनाडूत म्हणे सिनेमातही रजनीकांतवर कुणी हात उचललेला चाहत्यांना पचत नाही. अशा सीन्सवर बंदी आणण्याची मागणी केली गेली होती. पण हिंदीत बंदी घातली समस्त महिला वर्गावरील अन्यायाला! टीव्हीवर अशी बंदी घातली तर काय होईल ? डेली सोप्सवाले तर घरीच बसतील...

पण उसनं अवसान आणत दिग्दर्शकाने बोलायला सुरूवात केली. नाना पाटेकर जसा बोलताना समोरच्याशी बोलतोय, की स्वतःशीच बुद्धीवादी संवाद साधतोय असं वाटतं ना.. तसाच काहीशा पद्धतीने बोलत दिग्दर्शकाने असिस्टंटला समजवायला सुरूवात केली. “आजचा सिनेमा हा खूप पुरोगामी आहे. आणि सेन्सॉर प्रतिगामी. आता बघ