ही कारणेः का होते ढगफुटी, का येतो महापूर

ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या खतरनाक स्थितीत

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 20, 2013, 07:32 PM IST

प्रशांत जाधव
ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या खतरनाक स्थितीत आकाश भिरभिरणाऱ्या ढगातून मोठ्या प्रमाणातून पाणी पडते की त्या घटनेला ढगफुटी म्हणतात.
यावेळी ढगांचा गडगडाट होतो आणि अशा प्रकारे पाणी पडते की महापुराची स्थिती निर्माण होते. ढग फुटण्याची ही प्रक्रिया जमिनीपासून सुमारे ४९२१२.६ फुटांवर होते.
या दरम्यान जो पाऊस पडतो त्याचा वेग ताशी १०० किलोमीटर असतो. काही मिनिटातच २ सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडतो तो केदारनाथ आणि उत्तरकाशीत झालेल्या नुकसानासारखा हाहाकार माजवतो.
का होते अशी स्थिती
ढग फुटीच्या वेळी ढगांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता म्हणजे पाणी असते. पावसाळ्यात या सर्व पाण्यासह ढग संचार करत असतात. या ढगांना अडथळा निर्माण झाला की हे ढग फुटतात. ही घटना फारच जलद गतीने होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, असे हवामान खात्याच्या वैज्ञानिकांनी याच्या तांत्रिक बाबीवर प्रकाश टाकला.
काही लाख लीटर पाणी
या अवस्थेत ढगातून जमिनीवर काही लाख लीटर पाणी पडते. हे पाणी लोकांना वाचण्याचा आणि सुरक्षित जागी जाण्याची संधी देत नाही. हिच घटना उत्तराखंडच्या नुकसान झालेल्या भागात झाली आहे. या पाण्याच्या रस्त्यात येणारी कोणतही वस्तू कितीही मजबूत असली ती नेस्तानाबूत होऊन जाते. उत्तराखंडातील चित्रात आपल्याला हेच दिसते.
भारत असे का?
भारतात नेहमी हिमालयामुळे अशा प्रकारच्या घटना पर्वतीय भागात होत असतात. नैऋत्य मौसमी वाऱ्याद्वारे ढग उत्तरेकडे जातात. हिमालयामुळे ढगांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान याच भागात होते. हिमालय क्षेत्रात ढग फुटीमुळे ७५ मि.मी ताशी वेगाने पाऊस पडतो.

ढगफुटीचे आणखी एक कारण
पाण्याने भरलेला ढगाला गरम हवेचा प्रवाह धडक देतो आणि त्यामुळेही ढगफुटी होते.
प्रमुख घटना भारत आणि आसपास
- 26 जुलै 2005 रोजी मुंबईत अशा प्रकारे ढगफुटी झाली होती.
- 18 जुलै 2009 रोजी पाकिस्तानच्या कराची शहरात ढगफुटी झाली होती. यामुळे 2 तासात 250 मि.मी. पाऊस पडला होता.
- 6 ऑगस्ट 2010 रोजी भारतातील जम्मू आणि कश्मीरच्या लद्दाख आणि लेहमध्ये ढग फुटीच्या घटनेने संपूर्ण लेह शहराचे नुकसान झाले होते. या घटनेत 115 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर 300 हून अधिक जखमी झाले होते.
- आता 2013 मध्ये उत्तरकाशी और उत्तराखंड येथील घटना घडली. यात देवासह मनुष्यालाही हानी पोहचवली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.