टेक रिव्ह्यू : गुगल नेक्सस ५

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, November 23, 2013 - 17:41


www.24taas.com
प्रणय पालव,
झी मीडिया, मुंबई

गुगलनं `एलजी`सोबत लॉन्च केलेला ‘नेक्सस ५’ हा स्मार्टफोन तुम्हाला नक्कीच अद्ययावत ठेवू शकतो. भारतात या फोनची ‘प्री बुकींग’ सुरू झालीय.
या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे अँन्ड्रॉईडचं लेटेस्ट व्हर्जन ‘किटकॅट ४.४’ या फोनमध्ये सुरुवातीपासूनच उपलब्ध असेल. १६ जीबी आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी अशा दोन ऑप्शनमध्ये हा फोन उपलब्ध आहे. परंतु, या फोनमध्ये एक्स्पान्डेबल मेमरीचा मात्र ऑप्शन नाही. एक नजर टाकुयात ‘गुगल नेक्सस ५’च्या वैशिष्ट्यांवर...

‘गुगल नेक्सस ५’ची काही वैशिष्ट्यं पाहुयात...
> प्रोसेसर : २.२६ गिगा-हर्टझ क्वाड-कोअर क्रेट सीपीयूसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८००
> ऑपरेटींग सिस्टम : अँन्ड्रॉईड ४.४, किटकॅट
> डिसप्ले : ४.४५ इंचाची स्क्रिन
> नेटवर्क : सीडीएमए, जीएसएम, डब्ल्यूसीडीएमए, एलटीई
> इंटरनल मेमरी : १६ जीबी / ३२ जीबी
> रॅम : २ जीबी
> कॅमेरा : ‘ओआयएस’सह ८.० मेगापिक्सल / पुढचा कॅमेरा – १.३ मेगापिक्सल हायडेफिनेशन
> बॅटरी : २,३०० मेगाहर्टझ Li-Polymer
> वजन : १३० ग्रॅम
> आणखी : वायरलस चार्जिंग, एनएफसी

‘गुगल नेक्सस ५’ची किंमत

> १६ जीबी इंटरनल मेमरी - २८,९९९
> ३२ जीबी इंटरनल मेमरी - ३२,९९९
> एक्स्पान्डेबल मेमरी उपलब्ध नाही

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013 - 17:38
comments powered by Disqus