<B> टेक रिव्ह्यू : मायक्रोमॅक्स डुडल २ </b>

‘मायक्रोमॅक्स’चा आकर्षक आणि सुंदर लूक असणारा ‘कॅन्व्हास डुडल २’.... बाजुला अॅल्युमिनिअम फ्रेम असणारा पण सडपातळ असा हा फोन...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 22, 2013, 09:26 PM IST


www.24taas.com
प्रणय पालव,
झी मीडिया, मुंबई

‘मायक्रोमॅक्स’चा आकर्षक आणि सुंदर लूक असणारा ‘कॅन्व्हास डुडल २’.... बाजुला अॅल्युमिनिअम फ्रेम असणारा पण सडपातळ असा हा फोन... उजव्या भागात वरच्या बाजुला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि त्याच्या बाजुलाच एलईडी फ्लॅशची सुविधा... या मोबाईलचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे या मोबाईलमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेराही उपलब्ध आहे. या मोबाईलची किंमत आहे, २०,००० रुपये...

‘कॅन्व्हास डुडल २’ची काही वैशिष्ट्यं पाहुयात...
> स्क्रीन : ५.७ इंचाचा ‘आयपीएस-एलईडी’ डिस्प्ले (१२८० X ७२० पिक्सल रिझोल्युशन)
> अँन्ड्रॉईड जेली बीन ४.२.१
> प्रोसेसर : एमकेटी क्वाड कोअर १.२ गिगाहर्टझ
> १६ जीबी इंटरनल मेमरी (यातील १३ जीबी मेमरी युजर्सला वापरण्यासाठी आहे)
> रॅम एक जीबी
> रेअर कॅमेरा : १२ मेगापिक्सल
> पुढचा कॅमेरा : ५ मेगापिक्सल (व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयोगी)
> ड्युएल एलईडी फ्लॅश उपलब्ध

घ्याल तर का…
> आकर्षक डिझाईन
> बॅटरीचं उत्तम आयुष्य
> प्री-लोडेड अॅप्लिकेशन
कशासाठी टाळाल...
> नॉन एक्पान्डेबल स्टोअरेज (मेमरी कार्ड टाकण्यासाठी सुविधा नाही)
> इतर मोबाईलच्या तुलनेत जड आहे.
> फिचर्सच्या मानानं थोडा महागच आहे

रेटींग
> डिझाईन : ३.५
> डिस्प्ले : ३
> कॅमेरा : ३
> परफॉर्मन्स : ३
> सॉफ्टवेअर : ३.५
> बॅटरी लाईफ : ३.५
> पैशाच्या तुलनेने : ३
> संपूर्ण परफॉर्मन्स : ३