दहशतवादी आणि नेपाळ

काही दिवसांपूर्वी दहशतवादी अब्दुल करीम टुंडा आणि आता यासीन भटकळ या दोघांना पोलिसांनी अटक केलीय...विशेष म्हणजे या दोघांनाही भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आलीय..दहशतवादी आणि नेपाळ यांचं काय नातं आहे त्याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 30, 2013, 08:35 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काही दिवसांपूर्वी दहशतवादी अब्दुल करीम टुंडा आणि आता यासीन भटकळ या दोघांना पोलिसांनी अटक केलीय...विशेष म्हणजे या दोघांनाही भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आलीय..दहशतवादी आणि नेपाळ यांचं काय नातं आहे त्याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
शाहरुख, डॉ. इमरान,यासीन भटकळ , जरार अहमद सिद्दीबाप्पा...ही सगळी नावं आहेत दहशतवादाच्या फॅक्टरीची. मात्र आता यासीनच्या मुस्क्या आवळून तपास यंत्रणेनं मोठं यश मिळवलंय..दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, सुरत, जयपूर, हैदराबाद, बंगळुरु, पुणे आणि वाराणसीसह देशातील अनेक ठिकाणी या सैतानाने बॉम्बस्फोट घ़डवून निष्पाप जीवांचा बळी घेतलाय..यासीन पोलिसांच्या हाती लागल्यामुळे अनेक दहशतवादी कटांचा उलगडा होण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासीन भटकळ ब-याच वर्षापासून पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या आश्रयाने पाकिस्तानत द़डून बसला होता. सीमेपलिकडून तो दहशतवादी कारवया करत होता. भारतात झालेल्या बॉम्बस्फोटा व्यतिरिक्त आणखी काही स्फोट माहिती यासीन भटकळकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी लियाकत अली, अब्दुल करीम टुंडा आणि आता यासीन भटकळ यांना भारत-नेपाळ सीमेवरुन अटक केलीय. यावरुन नेपाळमध्ये दहशतवाद्यांचा वावर असल्याचं आता लपून राहिलं नाही..भारतात येण्याजाण्यासाठी दहशतवाद्याकडून नेपाळ मार्गाचा वापर केला जात असल्याचं उघड झालंय...यासीन भटकळच्या अटकेमुळे डॉन दाऊद इब्राहिम आणि आयएसआय संदर्भात महत्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

यासीन भटकळ इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक असून .या दहशतवादी संघटनेची सूत्र त्याच्या हाती होती. आपल्या संघटनेत नवीन दहशतवादी तयार करण्यापासून ते बॉम्बस्फोट घडवण्यापर्यंत सगळी कामं त्याच्या देखरेखी खाली होत असतं. यासीन भटकळच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिद्दीन आणि त्यांच्या दहशतवादी कारवायांविषयीची माहिती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
गेल्या दोन आठवड्यात दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात गुप्तचर आणि तपास यंत्रणांना यश आलंय. अब्दुल करीम टुंडा आणि आता यासीन भटकळला अटक झालीये. भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम कधी जेरबंद होणार ? असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे यासीन भटकळच्या अटकेमुळे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्यात मदत होईल का, हा प्रश्न कायम आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.