मायानगरीत महिलांचे ‘भीती’चे घर

महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी मुंबई दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालली आहे. यामुळे मुंबईतील प्रत्येक महिला आता स्वत: असुरक्षित मानू लागली असून प्रत्येकिच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण आहे. ही भीती दूर करण्यासाठी ठोस उपाय-योजना आहेत का? मनातील ही भीती कायमची तर राहणार नाही ना?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 3, 2013, 10:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी मुंबई दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालली आहे. यामुळे मुंबईतील प्रत्येक महिला आता स्वत: असुरक्षित मानू लागली असून प्रत्येकिच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण आहे. ही भीती दूर करण्यासाठी ठोस उपाय-योजना आहेत का? मनातील ही भीती कायमची तर राहणार नाही ना?
मग ही भीती एका सामान्य नोकरदार महिलेच्या मनातील असो किंवा किंवा अगदी चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात काम करणा-या महिलेच्या मनातील असो. मुंबईत महिलांवर होणारे अत्याचार आणि वाढत्या बलात्काराच्या घटना यामुळे महिलांच्या मनता भीतीचे घर निर्माण झाले आहे. ही भीती दूर करणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आणि कायद्याचे भय गुन्हेगारांना राहिले नसल्याने महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याची चर्चा आहे. महिलांची ठोस सुरक्षा घेणार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

गिरणगाव आणि मायानगरी ही मुंबईची कधीकाळी ओळख होती...मात्र गिरणगाव ही मुंबईची ओळख केव्हा पुसून गेली हेच कळल नाही आणि आता या बंद पडलेल्या गिरण्या अनेक क्रिएटीव्ह डायरेक्टर्स आणि फोटोग्राफर्ससाठी शूट करण्यासाठी उत्कृष्ट लोकेशन्स ठरू लागल्या. बंद पडलेल्या गिरण्या, कारखाने, सिनेमागृह, पडके वाडे, जुन्या इमारती आणि किल्ले म्हणजे सेलिब्रेटींच्या शूटसाठी एक उत्तम लोकेशन मानल जाते. मात्र आता हिच ठिकाण गुन्हेगारीवृत्तीचे लोक आणि उत्तेजक द्रव्य घेणा-यांचे अडडेही बनले आहेत. म्हणूनच शक्ती मिलमध्ये झालेल्या बलात्कारानंतर आता महिला सेलिब्रेटीही अशा ठिकाणी शूट करण्यासाठी जाताना घाबरत आहेत. हा धोक्याचा इशारा राज्य सरकार गांभीर्यान कधी घेणार? महिलांना सुरक्षितेबाबत कोण धीर देणार?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ