विकेन्ड डेस्टिनेशन : हाजरा फॉल, गोंदिया

By Shubhangi Palve | Last Updated: Sunday, August 4, 2013 - 15:15

www.24taas.com,
माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा

मॉन्सूनमध्ये विकेन्ड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळते. आज आपण पाहणारा आहोत गोंदिया जिल्ह्यातला हाजरा फॉल...

गोंदियाचा हाजरा फॉल
उंच पहाडा वरून खाली कोसळणाऱ्या धारा… पांढऱ्या शुभ्र दुधालाही लाजवणारे विहंगम दृश… आणि या दृश्यांना डोळ्यात सामावून घेण्याकरिता दुरून दुरून जमलेली पर्यटक… हे दृश्यं दिसतं हाजरा फॉलजवळ…
तब्बल २०० मीटर उंचीवरून कोसळणारं पाणी इथे तुषारांचं धुकं तयार करतं. विशेष म्हणजे हा धबधबा मानवनिर्मित आहेत. ब्रिटीश काळात रेल्वे मार्ग बांधण्यासाठी पहा़ड खोदावा लागला त्यातून हा धबधबा तयार झालाय. धबधबा तयार करणाऱ्या हजर नावाच्या रेल्वे इंजिनिअरचा पुतळाही इथे आहे. या धबधब्याच्या वरच्या भागातून मुंबई हावडा रेल्वेलाईन आहे. पावसाळ्यात या धबधब्यात मजा करण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते.
इथं पोहचणार कसं...
दरेकसा रेल्वे स्थानकापासून १० किलोमीटरवर जंगलात हा धबधबा आहे. या धबधब्याची उंची जवळपास २०० फुट आहे. भटकंती करणाऱ्यांसाठी हे एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे.

प्रवाशांची मागणी
या धबधब्यावर खूप ठिकाणांहून पर्यटक येतात. छत्तीसगढमधूनही पर्यटक येतात. मात्र, पर्यटकांसाठी फारशा सोयी इथे नाहीत. त्या प्रशासनाने करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येतेय. इथे पोहोचण्यासाठी रस्ता चांगला नाही, त्यामुळे पर्यटकांसाठी चांगला रस्ता करून देण्याची मागणी पर्यटकांनी केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, August 4, 2013 - 15:14
comments powered by Disqus