ऊसाचे पीक घेताय, सरकारने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

पाटचारीतून मोकाट पाणी दिल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.

Updated: Aug 31, 2018, 08:56 PM IST
ऊसाचे पीक घेताय, सरकारने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय title=

जळगाव: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे उसाच्या शेतीला पाणी देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ड्रिप इरिगेशन सक्तीचे करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. ऊसाला पाटचारीतून मोकाट पाणी दिल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. त्याचप्रमाणे कसदार जमिनीचा पोतही खराब होतो. त्यावर उपाय म्हणून पाणीबचत तसेच शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न वाढावे यासाठी शासनाने ऊस उत्पादकांना ड्रिप इरिगेशन सक्तीचे केल्याचे महाजन यांनी सांगितले.