'हा' क्षण माझ्यासाठी अभिमानाचा- भूमी पेंडणेकर

Feb 13, 2018, 16:38 PM IST
1/5

Bhumi Pednekar

Bhumi Pednekar

भारतीय सिनेमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेंडणेकरला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबत बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमंत्रित केले आहे. यावेळी भूमीने सांगितले की, या आमंत्रणाबद्दल मी अत्यंत सम्मानित आणि कृतज्ञ आहे. मी भारतीय सिनेमांचे प्रतिनिधित्व करणार आणि हा माझ्यासाठी मोठा क्षण आहे.

2/5

Bhumi Pednekar

Bhumi Pednekar

हिंदी सिनेमातील प्रतिभाशाली अभिनेत्रींमध्ये भूमीची गणणा होईल. या चित्रपट महोत्सव १५-२५ जानेवारी असा आयोजित करण्यात आला आहे.

3/5

Bhumi Pednekar

Bhumi Pednekar

भूमीने 'दम लगा कर हयशा' या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करियरची सुरूवात केली होती. त्यानंतर तिने काही दिवसांसाठी चित्रपटातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती २०१७ मध्ये आलेल्या टॉयलेट- एक प्रेमकथा चित्रपटात दिसली.

4/5

Bhumi Pednekar

Bhumi Pednekar

त्यानंतर तिने आयुष्मान खुरानासोबत शुभ मंगल सावधान या चित्रपटात काम केले. हे दोन्हीही चित्रपट सामाजिक मुद्द्यांवर आधारित आहेत. यानंतर भूमीचे नाव २०१८ च्या 'फॉर्ब्स इंडिया'च्या अंडर ३० च्या यादीत सहभागी झाले.

5/5

Bhumi Pednekar

Bhumi Pednekar

'फॉर्ब्स इंडिया'च्या यादीत नाव शामिल झाल्याने भूमी अत्यंत खूश आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close