गाडी घेतल्याच्या आनंदात व्यापाऱ्यानं वाटले सोनेरी पेढे

पुणे जिल्ह्यात आपला आनंद साजरा करण्यासाठी एका व्यापाऱ्यानं सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटलेत

Sep 07, 2018, 15:51 PM IST

पुणे जिल्ह्यात आपला आनंद साजरा करण्यासाठी एका व्यापाऱ्यानं सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटलेत

1/5

जॅग्वार विकत घेतली

जॅग्वार विकत घेतली

सुरेश पोकळे यांनी जॅग्वार एक्स एफ कार घेतल्यानंतर, या माणसाने चक्क सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटले 

2/5

हलवायालाही आवडली कल्पना

हलवायालाही आवडली कल्पना

सुरेश पोकळे यांना सोन्याचे पेढे वाटायचे होते, त्यांनी ही कल्पना काका हलवाई यांच्याकडे मांडली... आणि हलवायानंही सोनेरी वर्ख लावून बनवलेले पेढे बनवून दिले

3/5

एका पेढ्याची किंमत

एका पेढ्याची किंमत

काका हलवाई यांनी ७ हजार रूपये किलोने हे पेढे सुरेश पोकळे यांना बनवून दिले. एका किलोत ३० पेढे देण्यात आले आहेत... हा एक पेढा २३३ रूपयांचा आहे

4/5

सोनेरी क्षण

सोनेरी क्षण

पुणे जिल्ह्यातील घायरी गावचे सुरेश रामनाथ पोकळे यांनी जग्वार एक्स एफ ही गाडी घेतली. आता हा त्यांच्यासाठी निश्चितच सोनेरी क्षण होता.

5/5

जॅग्वार आनंद

जॅग्वार आनंद

पिढ्यांपिढ्या शेती करूनही, त्यांनी कधी एवढ्या महागड्या ब्रॅण्डची गाडी घेतली नाही. पण इतर व्यवसायाच्या मदतीने अनेक वर्षापासून त्यांनी हालाखीतून वर येत, आज कुटूंबाची स्थिती जग्वार गाडी वापरण्यापर्यंत आणून ठेवली. या गाडीची किंमत १ कोटी १४ लाख असल्याचं सांगण्यात येत आहे.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close