सिंगापूरमध्ये चिमुकल्याने अशा प्रकारे केलं राहुल गांधींचं स्वागत

Mar 08, 2018, 19:33 PM IST
1/5

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या सिंगापूर-मलेशिया या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. १६ मार्च ते १८ मार्चपर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचं अधिवेशन होणार आहे. (फोटो सौजन्य: @INCIndia/ट्विटर)

2/5

राहुल गांधी यांनी आपल्या या दौऱ्यातील काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करतताना राहुल गांधींनी कॅप्शनमध्ये म्हटलयं, "सिंगापूर विमानतळावर चिमुकल्या मित्राला भेटून मला खूपच आनंद झाला."

3/5

सिंगापूर दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राहुल गांधींनी भारतीय वंशांच्या सीईओंची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी गुंतवणुक, नोकरी आणि अर्थव्यवस्थेसोबतच इतरही मुद्यांवर चर्चा केली.  

4/5

राहुल गांधी सिंगापूर विमानतळावर दाखल होताच तेथील चांगी विमानतळावर एका चिमुकल्याने त्यांचं स्वागत केलं. हा चिमुकला राहुल गांधींचा फोटो असलेला पोस्टर घेऊन राहुल गांधींच्या स्वागतासाठी उपस्थित होता. विमानतळावर चिमुकला चाहता पाहून राहुल गांधींनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी या चिमुकल्याला घट्ट मिठी मारत प्रेम व्यक्त केलं.

5/5

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सिंगापूर-मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींचा हा दौरा खूपच खास आहे. सिंगापूर विमानतळावर दिसलेल्या या चिमुकल्याने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं.