रेल्वेच्या पार्सलच्या डब्यातून नेता येतो मृतदेह; अशी आहे प्रोसेस

रेल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह न्यायचा असेल तर काय आहे प्रक्रिया जाणून घेऊया. 

| May 14, 2024, 21:43 PM IST

Railway Parcel Bogie : सपूर्ण देशभरात भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत संपूर्ण देश रेल्वेने जोडला आहे. रस्ते आणि विमान वाहतुकीपेक्षा रेल्वे प्रवास स्वत आहे. देशभरात लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांसह रेल्वेत पार्सल वाहतुकीची देखील सोय आहे. अशाच प्रकारे  रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून  मृतदेह देखील नेता येतो. 

1/7

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये लगेज डबा देखील असतो. या डब्यामधून प्रवाशांना त्याचे पार्लस नेता येता तसेच पाठवता देखील येते. पार्सल डब्यातून मृतदेह देखील नेता येतो. 

2/7

 मृतदेह रेल्वेने पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागते. मृत्यू प्रमाणपत्र, औषधोपचाराची कागदपत्रे, पोलिस पडताळणी अहवाल, आधारकार्ड आदी कागदपत्रे सादर करावी लागतात. 

3/7

 रेल्वेच्या एसएलआर कोचमधून मृतदेहाचे पार्सल नेले जाते. हा कोच ट्रेनच्या सुरुवाचीला किंवा शवेटी असतो. या कोचमध्ये मृतदेहाव्यतीरीक्त कोणतेही पार्सल ठेवले जात नाही. 

4/7

भारतीय रेल्वेने दायित्व म्हणून रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह नेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

5/7

 हवाईमार्गे किंवा रस्ते मार्गे मृतदेह एका शहरातून दुसऱ्या शहरात नेणे अत्यंत खार्चिक आहे. मात्र, रेल्वेच्या मदतीने मृतदेह अल्प खर्चात पाठवता येऊ शकतो.  

6/7

रेल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह नेण्याची देखील व्यवस्था असते. मात्र, यासाठीची प्रोसेस पूर्ण करावी लागते.

7/7

कुंटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास पार्थिव एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायचे असल्यास हवाई मार्गे किंवा रस्तेमार्गे न्यावे लागते. मात्र, रेल्वेने देखील मृतदहे नेता येतो.