१० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणाऱ्या या अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Jan 21, 2018, 19:42 PM IST
1/5

Manjari Fadnis

Manjari Fadnis

मराठमोळी अभिनेत्री मंजिरी फडणीस बॉलिवूडला सर्वात चांगलं रहस्य मानते. मंजिरीने म्हटलं की, सिनेसृष्टीत व्यावसायिक नेटवर्क बनवायचं नव्हतं. त्यामुळे माझं करिअर प्रभावित झालं आणि माझी क्षमता एक रहस्य बनली. मंजिरीने २००४ मध्ये 'रोक सको तो रोक लो' या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 'जाने तू...या जाने न' या सिनेमात मंजिरी झळकली. बॉलिवूडमध्ये एक दशक काम केल्यानंतरही अभिनेत्री मंजिरीला हवं तसं यश मिळालं नाही. आपल्या क्षमतेचा खूपच कमी उपयोग झाल्याचं मंजिरीने म्हटलं आहे.

2/5

Manjari Fadnis

Manjari Fadnis

अभिनेत्री मंजिरीने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "मला असं वाटतं की यामुळेच माझ्या करिअरचा वेग कमी राहीला. पण मला वाटतं की आता ही योग्य वेळ असून मी माझा वेग पकडत आहे."

3/5

Manjari Fadnis

Manjari Fadnis

मला नेहमीच विश्वास होता की माझं काम बोलेलं मात्र, तसं झालं नाही. मी बॉलिवूडमधील सर्वात चांगल्या रहस्यांपैकी एक आहे असं मला वाटतं असंही अभिनेत्री मंजिरीने म्हटलयं.

4/5

Manjari Fadnis

Manjari Fadnis

अभिनेत्री मंजिरीने अरबाज खानने अभिनय केलेल्या 'निर्दोष' या सिनेमात एका गृहिणीच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. हा सिनेमा एक सस्पेंस थ्रिलर आहे.

5/5

Manjari Fadnis

Manjari Fadnis

मंजिरीने पुढे म्हटलं की, "अरबाज सरांसोबत हा चौथा सिनेमा आहे. मी खूप आनंदी आहे की या सिनेमात मला काम मिळालं." (सर्व फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)