ईशा अंबानीचा 'एमबीए'चा ग्रॅज्युएशन सेरेमनी

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीनं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. ईशानं याच वर्षी जूनमध्ये स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमधून मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची (एमबीए) डिग्री मिळवलीय. या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी 26 वर्षीय ईशाचं संपूर्ण कुटुंब हजर झालं होतं. सोबतच ईशाचा होणारा नवरा अर्थात आनंद पीरामलही उपस्थित होता. 

Sep 13, 2018, 14:11 PM IST

 

1/5

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

ईशानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत नीता अंबानी, मुकेश अंबानी, आनंद पीरामल, आकाश अंबानी, श्लोका मेहता आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. ईशानं येलमधून यापूर्वी सायकोलॉजी आणि साऊथ एशियन स्टडीज पूर्ण केलीय. तिनं स्टॅनफोर्ड नर्सरीमध्ये आपल्या शिक्षणादरम्यान शिकवण्याचं कामही केलं.

2/5

ईशा-आनंदचा साखरपुडा

ईशा-आनंदचा साखरपुडा

ईशाचा याच वर्षी मे महिन्यात साखरपुडा पार पडला होता. महाबळेश्वरच्या एका मंदिरात आनंदनं ईशाला प्रपोज केलं होतं... आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबानं सोबत जेवण केलं. 

3/5

व्यावसायिक कुटुंब

व्यावसायिक कुटुंब

आनंद पीरामल हा व्यावसायिक अजय पीरामल यांचा मुलगा आहे. ईशा-आनंदचा विवाह भारतातच होणार आहे. 

4/5

दोघांच्या कुटुंबाविषयी

दोघांच्या कुटुंबाविषयी

ईशा आणि आनंद एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांचे कुटुंबीय एकमेकांना चार दशकांपासून ओळखतात. 

5/5

आनंद काय करतो?

आनंद काय करतो?

आनंदनं हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलंय. तो सध्या पीरामल एन्टरप्राईजचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं आपले दोन स्टार्टअप्स सुरू केले होते. पहिलं हेल्थकेअर स्टार्टअप होतं...ज्याचं नाव पीरामल ई स्वास्थ्य असं होतं. तर दुसरं स्टार्टअप पीरामल रिअॅलिटी हे रिअल इस्टेटशी संबंधित होतं. आता दोन्ही पीरामल एन्टरप्राईजचाच एक भाग आहेत. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close